अमरावती - नेत्रदान, अवयवदान, देहदान हे सर्वात मोठे दान आहे. नेत्रदान हे असे एक दान आहे की, ज्याद्वारे अंध व्यक्तीच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांनाही रंगतदार जग पाहता येतं. असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अमरावतीच्या हरिना नेत्रदान समितीच्यावतीने दरवर्षी नेत्रदान जनजागृती उपक्रम राबवण्यात येतो, यावर्षीही तो राबवण्यात आला आहे.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर शहरातील हरिना नेत्रदान समितीच्यावतीने आजजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेत्रदानाचा संकल्प करणारी रांगोळी काढण्यात आली. यावेळी नेत्रदान जनजागृती उपक्रमाचे उदघाटन यशोमती ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शामसुंदर निकम, हरिना नेत्रदान समितीचे चंद्रकांत पोपट, सुरेंद्र पोफळी, पप्पु मुनोत, रश्मी नावंदर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोनिका उमक यांनी केले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कोरोना असल्यामुळे हा उपक्रम यावर्षी रांगोळीच्या माध्यमातून जनजागृतीद्वारे साजरा करण्यात आला असला तरी, हा नेत्रदानाचा संदेश समाजात रुजविणे महत्वाचे असल्याचे यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
अमरावतीत नेत्रादन दिन साजरा