अमरावती - जिल्ह्याचे तापमान 41 अंशाच्या समोर गेले आहे. वाढत्या तापमानामुळे अमरवतीकरांचा जीव मेटाकूटीला आला आहे. मात्र, अमरावतीमधील कामगार कल्याण कार्यलयात विदारक चित्र पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील हजारो कामगार नोंदणीसाठी या कार्यालयात येत आहेत. मात्र, भर उन्हात ताटकळत उभ्या असणाऱ्या या कामगारांसाठी सावली सोडाच पण पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे कामाच्या अपेक्षेने आलेल्या या कामगारांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे.
सोशल डिस्टनचा पूर्णपणे फज्जा
अमरावती जिल्ह्यात कोराना रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाकडून 30 एप्रि पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेशही देण्यात आले आहे. परंतु कामगार कल्याण कार्यालयात मात्र सर्व नियम पायदळी तुडवले जात आहे. नोंदणीसाठी येणाऱ्या कामगारांकडून सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडवला जात असून अनेक कामगारांच्या तोंडावर मास्क देखील लावले नव्हते. नोंदणीसाठी आलेले कामगार संपूर्ण जिल्ह्यातून येत असतात त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .
प्रत्येक तालुक्यावर व्हावी नोंदणी
कामगार नोंदणीसाठी अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील कामगार एकाच ठिकाणी जमत आहे. जर कामगार विभागाच्यावतीने प्रत्येक तालुक्यात कामगार नोंदणी केली तर गर्दीत टाळता येईल असे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराविषयी कामगार आयुक्त कुटे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी वारंवार संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा - LIVE UPDATE : देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग, अजितदादा-वळसे पाटील सिल्वर ओकवर