ETV Bharat / state

नांदगाव खंडेश्वर येथे समृद्धी महामार्गावरील कामगाराचा मृत्यू - अमरावती लेटेस्ट न्युज

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या एनसीसी कंपनीच्या 80 कामगारांना नांदगाव खंडेश्वर येथील पद्मपाणी मंगल कार्यालयात ठेवले आहे. यापैकी अरविंद कानुबाई रोहडिया हे याठिकाणी राहत होते. कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांना छातीत दुखायला लागले आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. अखेर 6 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

amravati latest news  nandgaon khandeswar worker death  samrudhhi highway worker  नांदेगाव खंडेश्वर कामगार मृत्यू  अमरावती लेटेस्ट न्युज  समृद्धी महामार्गावरील कामगाराचा मृत्यू
नांदगाव खंडेश्वर येथे समृद्धी महामार्गावरील कामगाराचा मृत्यू
author img

By

Published : May 20, 2020, 5:36 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे समृद्धी महामार्गाच्या कामावर काम करणाऱ्या एका कामगाराचा पद्मपाणी मंगल कार्यालय येथे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. अरविंद कानुभाई रोहडिया (47), असे मृताचे नाव असून तो हैदराबादचा रहिवासी आहे. त्याच्या मृत्यूची माहिती समोर येताच परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या एनसीसी कंपनीच्या 80 कामगारांना नांदगाव खंडेश्वर येथील पद्मपाणी मंगल कार्यालयात ठेवले आहे. यापैकी अरविंद कानुबाई रोहडिया हे याठिकाणी राहत होते. कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांना छातीत दुखायला लागले आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. अखेर 6 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या कामगाराचा मृत्यू झाल्याची अफवा पसरताच परिसरात खळबळ उडाली. नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत चे अध्यक्ष संजय पोकळे यांनी या प्रकरणाची माहिती नांदगाव खंडेश्वर पोलिसांसह आरोग्य विभागाला दिली. नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय सायकर हे सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता देशमुख, नगरपंचायतीचे अभिजित लोखंडे हे पद्मपाणी मंगल कार्यालय येथे पोहोचले. यानंतर अरविंद रोडीया यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.