ETV Bharat / state

International Womens Day : आरोग्य अबाधित राखण्यासाठी सायकल रॅली उपक्रम अनुकरणीय - आमदार सुलभा खोडके

अमरावती सायकलिंग असोसिएशनतर्फे महिलांची सायकल रॅली काढण्यात आली. 'शरीर स्वास्थम खलूमहे' या घोषवाक्याकडे लक्ष वेधून मानव जातीचे आरोग्य सुरक्षीत राहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन जीवनात सक्रिय सायकल चालवणे महिलांसाठी मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले आहे.

International Women Day
International Women Day
author img

By

Published : Mar 5, 2023, 8:19 PM IST

आरोग्य अबाधित राखण्यासाठी सायकल रॅली उपक्रम

अमरावती : अमरावती सायकलिंग असोसिएशनचे वतीने महिला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शरीर स्वास्थम खलूमहे या शब्दपंक्तीकडे लक्ष वेधीत मानव प्रजातीला आरोग्य अबाधित राखण्यासाठी या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन जीवनात तत्पर, तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलिंग केल्यास ही बाब आरोग्य अबाधित राखण्यासाठी मोलाची ठरू पाहत असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी येथे केले. यासोबतच पर्यावरणाचा समतोल यथावत कायम राखण्यासाठी तसेच शारीरिक क्षमता, तंदुरुस्ती वृद्धिंगत होण्यासाठी नियमितपणे सायकलिंग करणे आवश्यक आहे. असा बहुमूल्य संदेश या सायकल रॅलीच्या निमित्ताने सर्व सायकलपटूंनी यावेळी शहरवासीयांना दिल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

सायकलिंग असोसिएशनचे आयोजन : यावेळी महिला सायकलपटूंना टी-शर्ट चे वितरण करण्यात आले. तदपूर्वी आमदार सुलभाताई खोडके यांनी सर्व सायकलपटूसोबत हितगुज करीत संवाद साधला. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमरावती सायकलिंग असोसिएशनचे वतीने आयोजित सायकल रॅली हा उपक्रम अभिनव-अनुकरणीय व प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी यावेळी उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

५० महिला सायकल पटुंचा सहभाग : यावेळी ५० महिला सायकलपटूंनी या रॅली मध्ये सहभाग नोंदवला होता. जिल्हा स्टेडियम येथून या सायकल रॅलीला सुरुवात झाल्यानंतर हॉटेल गौरी इन-कठोरा-नांदुरा-गाडगे नगर-मार्गे सायकलिंग करीत सायकलपटूंनी जवळपास २५ किलोमीटरचा टप्प्या पार केला. पंचवटी चौक मार्गे ही सायकल रॅली जिल्हा स्टेडियम येथे परतताच या रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, विधी मंडळ समन्वयक, प्रवक्ते संजय खोडके, एचव्हीपीएम सचिव डॉ. माधुरी चेंडके, प्रा.डॉ. मोहना कुलकर्णी, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, सचिव-अतुल कळमकर, मोनिका केडीया,आदीसहित अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सर्व सदस्य, पदाधिकारी, आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा - NCP Criticized AIMIM : 'एमआयएम'च्या आंदोलनात औरंगजेबचे पोस्टर झळकवण्यामागे भाजप; राष्ट्रवादीचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.