अमरावती - शहर कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याला गुरुवारी (दि. 2 जुलै) अचानक ताप आल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिचा स्वॅब (घशातील स्त्राव) घेण्यात आला. अहवाल येण्यापूर्वीच त्यांची शुक्रवारी (दि. 3 जुलै) सायंकाळी प्राणज्योत मालवली. तिला कोरोना झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले असून या घटनेमुळे पोलीस यंत्रणा हादरली आहे.
मृत महिला पोलीस कर्मचारिचा मोठा मुलगा सैन्यात असून तो उरी येथे तैनात आहे. आईच्या मृत्यूची माहिती मिळताच तो अमरावतीला येण्यासाठी निघाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहर कोतवाली पोलीस ठाण्यात मृत महिला पोलीस कर्मचारी कर्तव्यावर येत होती. यामुळे या पोलीस ठाण्याला कंटेंटमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) घोषित करण्यात आले आहे.
शनिवारी (दि. 4 जुलै) दिवसभर पोलीस ठाण्यात बाहेरच्या व्यक्तीला येण्यास मनाई करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
हेही वाचा - अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या 680 वर; शनिवारी आढळले 30 नवे रुग्ण