ETV Bharat / state

अमरावतीत जोरदार पाऊस; घुईखेडमध्ये घरांचे छप्पर उडाले, २४ तासांपासून वीज पुरवठाही खंडित - पाऊस

अमरावतीच्या घुईखेडमध्ये जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले.

अमरावतीत मुसळधार पाऊस
author img

By

Published : Jun 9, 2019, 3:21 PM IST

अमरावती - चांदूर रेल्वे तालुक्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले. यावेळी विजांसह पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पावसामुळे घुईखेडमध्ये २४ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे.

अमरावतीत मुसळधार पाऊस

दोन दिवसांपूर्वीच चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील सोनगाव आणि इतर भागात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले होते. यानंतर पुन्हा शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात पुन्हा अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घुईखेडमधील शेकडोंच्या घरावरील पत्रे उडाले. याशिवाय विजेचे काही खांब वाकले असून विद्युत तारा गावात लटकत आहे.

घुईखेड गावात भारनियमामुळे शनिवारी सकाळी साडे सहा वाजता वीज गेली होती. मात्र, आता रविवारचा दिवस उजाडून २४ तास उलटले तरी या गावातील विद्युत पुरवठा चालू झालेला नाही.

Intro:
अमरावतीच्या घुईखेडमध्ये अनेकांच्या घराचे उडाले छप्पर

चांदूर रेल्वे तालुक्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस

२४ तासांपासुन घुईखेडचा विद्युत पुरवठा खंडीतच

अमरावती

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. विजांसह पावसाने सुध्दा हजेरी लावली आहे. २४ तासांच्यावर झाले असतांना सुध्दा घुईखेडचा विद्युत पुरवठा अद्यापही पुर्वरत झालेला नाही.

*VO-*

दोन दिवसापुर्वीच चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील सोनगाव व इतर भागात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले होते. यानंतर पुन्हा शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात पुन्हा अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घुईखेडमधील शेकडोंच्या घरावरील टिने उडाली आहे. याशिवाय विजेचे काही खांब वाकले असुन विद्युत तारा गावात लटकत आहे. शनिवारी भारनियमामुळे सकाळी ६.३० वाजता लाईन गेली होती. तर काही विद्युत कामामुळे व सायंकाळच्या वाऱ्यामुळे रात्रभर लाईन सुरू झाली नाही. त्यामुळे घुईखेड गाव रात्री अंधारात होते. २४ तासांच्यावर झाले असतांना सुध्दा रविवारी सकाळीही विद्युत पुरवठा बंदच होता. तर चांदूर रेल्वे शहरात सुध्दा विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.