ETV Bharat / state

अमरावतीच्या भिवापूर येथे वन्यप्राण्यांची तस्करी; ४ मृत सायळ जप्त, एका आरोपीस अटक - वनपरिक्षेत्र

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माळेगाव वर्तुळातील कर्मचाऱ्यांनी भिवापूर येथे एका घरात धाड टाकून ४ मृत सायळ जप्त करण्यासोबत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अमरावतीच्या भिवापूर येथे वन्यप्राण्यांची तस्करी
author img

By

Published : Jul 13, 2019, 11:26 PM IST

अमरावती - चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भिवापूर येथे एका घरात धाड टाकून ४ मृत सायळ जप्त करण्यासोबत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील ३ आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. ही कारवाई चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माळेगाव वर्तुळातील कर्मचाऱ्यांनी केली.

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजा भिवापूर येथे वन्यप्राण्याची शिकार झाली. याबाबत प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून माळेगाव वर्तुळच्या वनपालांनी पथक तयार करून मौजा भिवापूर येथील आरोपी विशाल किसन राठोड याच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी घरामध्ये मृतावस्थेतील ४ वन्यप्राणी सायळ आढळून आले. त्यामुळे सदर आरोपीस अटक करण्यात आले.

दरम्यान, यावेळी या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत सामाविष्ट असलेले गोकुल रामदास चव्हाण, दिनेश भाऊराव चव्हाण, मंगल देविदास जाधव हे ३ आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपीच्या घरातून मृत ४ वन्यप्राणी ताब्यात घेऊन जप्तीनामा व पंचासमक्ष आरोपीचे घरी मौका पंचनामा नोंदविण्यात आला. तसेच आरोपी विशाल किसन राठोडला चौकशीकामी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ५० अन्वये अटक करण्यात आली. तर सदर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

Intro:अमरावतीच्या भिवापूर येथे वन्यप्राण्यांची तस्करी चार मृत सायळ जप्त.

एका आरोपीला अटक तिघे फरार

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील माळेगाव वर्तुळातील कर्नचाऱ्यांची कारवाई

अमरावती अँकर

अमरावतीच्याचांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भिवापूर येथे एका घरात धाड टाकून चार मृत सायळ जप्त केल्या असून एका आरोपीला अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. ही कारवाई चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माळेगाव वर्तुळातील कर्मचाऱ्यांनी केली.

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजा भिवापूर येथे झालेल्या वन्यप्राणी शिकारीबाबत प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून वनपाल, माळेगाव वर्तुळ यांनी पथक तयार करून व इतर कर्मचाऱ्यांसह तसेच दोन पंच यांच्यासह मौजा भिवापूर येथील आरोपी विशाल किसन राठोड याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरामध्ये मृतावस्थेत चार वन्यप्राणी सायळ आढळून आले. त्यामुळे सदर आरोपीस अटक करत असतांना या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत सामाविष्ट असलेले गोकुल रामदास चव्हाण, दिनेश भाऊराव चव्हाण, मंगल देविदास जाधव हे तीन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपीच्या घरातून मृत चार वन्यप्राणी ताब्यात घेऊन जप्तीनामा व पंचासमक्ष आरोपीचे घरी मौका पंचनामा नोंदविण्यात आला व आरोपी विशाल किसन राठोड ला चौकशीकामी वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ५० अन्वये अटक करण्यात आली व सदर गुन्ह्यातील आरोपी यांचे विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.