ETV Bharat / state

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाटात घडले १६ वाघांचे दर्शन - पर्यटक

मेळघाट व्याग्र प्रकल्पाच्यावतीने निसर्ग अनुभव उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ३५९ पर्यटकांनी जंगलातील रात्रीचा थरार अनुभवला. तर बुद्ध पौर्णिमेच्या रात्री एकूण १६ वाघांचे दर्शन घडले असल्याचे मेळघाट वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मेळघाटात घडले १६ वाघांचे दर्शन
author img

By

Published : May 20, 2019, 7:50 AM IST

Updated : May 20, 2019, 12:16 PM IST

अमरावती - बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात ३५९ पर्यटकांनी मेळघाट व्याग्र प्रकल्पाच्यावतीने आयोजित निसर्ग अनुभव या उपक्रमांतर्गत जंगलातील रात्रीचा थरार अनुभावला. यावेळी काही पर्यटकांना प्रत्यक्ष वाघ पाहायला मिळाला. तर बुद्ध पौर्णिमेच्या रात्री एकूण १६ वाघांचे दर्शन घडले असल्याचे मेळघाट वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे.

मेळघाट वन्यजीव विभागाच्यावतीने बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव हा उपक्रम राबविण्यात आला. चिखलदरा, तारुबंदा, ढाकणा, हरीसाल, कोहा कॅम्प, धुळघात रेल्वे, अकोट वनवृत्त, सेमाडोह, रायपूर, जारीदा, हतरु, चौराकुंड, जमली, बोथा, शहानुर, वान, वासली, शिवापूर, वाशिम जिल्ह्यात येणारे कारंजा सोहळा आणि अकोला जिल्ह्यात येणारे काटेपूर्णा या वन परिक्षेत्रात घनदाट जंगलात ज्याठिकाणी प्राण्यांची गणना होऊ शकेल, अशा ठिकाणी मचाणावर पर्यटकांची व्यवस्था करण्यात आली होती.

या सर्व ठिकाणी मिळून एकूण ४०६ मचाणांची व्यवस्था जंगलात पाणवठ्याजवळ असतील, अशा ठिकाणी करण्यात आली. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पर्यटकांच्या ४०६ जागा आरक्षित झाल्या होत्या. यापैकी प्रत्यक्षात ३५९ पर्यटक १८ एप्रिलला जंगलातील थरार अनुभवण्यासाठी पोहोचले होते. प्रत्येक वन परिक्षेत्रात जंगलात उभारण्यात आलेल्या मचाणावर राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

केवळ पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात मचाणाबाहेर पाणवठ्याकाठी येणारे प्राणी टिपणे, त्यांची येण्याची वेळ यासह एखादा आवाज आला तर तो किती वाजता आला याबाबत माहिती वन्यजीव विभागाने दिलेल्या नोंद वहीत पर्यटकांना नोंदवायचे होते. ४०६ मचाणावर वनरक्षकासह बसलेल्या पर्यटकांना जंगलाचा या आगळावेगळा अनुभव आला.

जंगल अनुभवादरम्यान १६ वाघांचे दर्शन पर्यटकांना घडले. २०१८ मध्ये सुद्धा बुद्धपौर्णिमेला मेळघाटात १६ वाघांचीच नोंद झाली होती. वाघांसोबतच २१ बिबट, २०९ अस्वल, १२५ जंगली कुत्री, ५५८ गावे, ५३१ जंगली डुक्कर, ६१२ सांबर, २६७ चितळ, २६७ हरणे, २१० नीलगाय, ३९ चारशींगे, १८ रॅटल, ३० हायना, ८८९ माकडांची बुद्धपौर्णिमेच्या रात्री नोंद झाली.

मेळघाटातील निसर्ग अनुभवाबाबत धुळघात रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत विविध मचाणावर बसलेल्या पर्यटकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आम्ही आयुष्यातील एक थरारक रात्र अनुभवल्याचे सांगितले. धुळघात वन परिक्षेत्र अधिकारी योगेश तापस यांनी धुळघात वन परिक्षेत्रात पहिल्यांदाच जंगल अनुभवाचे आयोजन केले होते. आमच्या परिक्षेत्रात पर्यटकांना अस्वल दिसल्या, वाघाची डरकाळी ऐकू आली. पर्यटकांनी जंगलाचा चांगला अनुभव घेतला, असे तापस यांनी यावेळी सांगितले.

Intro:( महत्वाचा वाघाचा विडिओ मेलवर पाठवतो, मोजोवरचेही विडिओ वापरणे)

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात ३५९ पर्यटकांनी मेळघाट व्याग्र प्रकालच्या वतीने आयोजित निसर्ग अनुभव या उपक्रमांतर्गत जंगलातील रात्रीचा थरार अनुभावला. या वेळी काही पर्यटकांना प्रत्यक्ष वाघ पाहायला मिळाला असून मेळघाटात बुद्ध पोर्णिमेचया रात्री एकूण १६ वांघांचे दर्शन घडले असल्याचे मेळघाट वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे.

Body:मेळघाट वन्यजीव विभागाच्यावतीने बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव हा उवक्रम राबविला. चिखलदरा, तारुबंदा, ढाकणा, हरीसाल, कोहा कॅम्प, धुळघात रेल्वे, अकोट वनवृत्त, सेमाडोह, रायपूर, जारीदा, हतरु, चौराकुंड, जमली, बोथा, शहानुर, वान, वासली, शिवापूर, वाशिम जिल्ह्यात येणारे कारंजा सोहळा आणि अकोला जिल्ह्यात येणारे काटेपूर्णा या वन परिक्षेत्रात घनदाट जंगलात ज्या ठिकाणी प्राण्यांची गणना होऊ शकेल आशा ठिकाणी मचाणावर पर्यटकांची व्यवस्था केली होती. या सर्व ठिकाणी मिळून एकूण ४०६ मचाणांची व्यवस्थ जंगलात पाणवठे जवळ असतील आशा ठिकाणी केली होती.ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पर्यटकांच्या ४०६ जागा आरक्षित झाल्या होत्या. यापैकी प्रत्यक्षात ३५९ पर्यटक १८ एप्रिलला जंगलातील थरार अनुभवण्यासाठी पोचले होते. प्रत्येक वन परिक्षेत्रात जंगलात उभारण्यात आलेल्या मचाणावर राहण्याची व्यबस्था करण्यात आली होती.
केवळ पोर्णिमेच्या चंद्र प्रकाशात मचाणाबाहेर पांणवठ्याकाठी येणारे प्राणी टिपणे, तसेच त्यांची येण्याची वेळ यासह एखाद्या त आवाज आला तर तो किती वाजता आला याबाबत वन्यजीव विभागाने दिलेल्या नोमदवहीत पर्यटकांना नोंदवायचे होते.
४०६ ही मचाणावर वनरक्षकासह बसलेल्या पर्यटकांना जंगलाचा या आगळा वेगळा अनुभाव आला.
जंगल अनुभवादरम्यान १६ वाघांचे दर्शन पर्यटकांना घडले आहे. २०१८ मध्ये सुद्धा बुद्धपोर्णिमेला मेळघाटात १६ वाघांचीच नोंद झाली होती.
वाघांसोबतच २१ बिबट, २०९ अस्वल, १२५ जंगली कुत्री, ५५८ गावे, ५३१ जंगली डुक्कर, ६१२ सांबर, २६७ चितळ, २६७ हरणं, २१० नीलगाय, ३९ चारशींगे, १८ रॅटल, ३० हायना, ८८९ माकडांची बुद्धीमपोर्णिमेच्या रात्री नोंद झाली.
मेळघाटातील निसर्ग अनुभवबाबत धुळघात रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत विविध मचाणावर बसलेल्या पर्यटकांनी 'ईटीव्ही भारता'शी बोलताना आम्ही आयुष्यातीळ एक थरारक रात्र अनुभवली असे सांगत अस्वलीला रात्री जवळून पाहिलं असे सांगितले. धुळघात वन परिक्षेत्र अधिकारी योगेश तापस यांनी धुळघात वन परिक्षेत्रात पहिल्यांदाच जंगल अनुभवाचे आयोजन करण्यात आले होते. आमच्या पृक्षेत्रात पर्यटकांना अस्वल दिसल्या, वाघाची डरकाळी ऐकू आली. पर्यटकांनी जंगलाचा अनुभव घ्यावा असेही तापस म्हणालेत.

Conclusion:
Last Updated : May 20, 2019, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.