ETV Bharat / state

Husband Murder Case : पत्नीचे अनैतिक संबध अन् पती द्यायचा त्रास, प्रियकराच्या मदतीने केला पतीचा घात - अनैतिक संबधातून पतीची हत्या

पत्नीचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्यावर पतीने पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली. यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. प्रियकराने आपल्या मित्रांच्या साहय्याने प्रेयसीच्या पतीची हत्या केली. या थरारक घटनेमुळे अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे राजुरवाडी गाव हादरले आहे.

Husband Murder Case Amaravati
पतीची हत्या
author img

By

Published : May 2, 2023, 10:01 PM IST

अमरावती: सोमवारी सायंकाळी राजुरवाडी येथील शेख शिवारात किसन वसंतराव धुर्वे (47) याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत किसनचा भाऊ सतीश दुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, मृत किसनच्या पत्नीचे गावातील बबलू उर्फ इजाज खान शब्बीर खान पठाण याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हत्येपूर्वी किसनला ही माहिती कळली होती. यामुळे अस्वस्थ होऊन त्याने पत्नीला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. पत्नीने ही बाब तिचा प्रियकर इजाज खान याला सांगितली. त्यानंतर प्रियकराने किसनचा काटा काढण्यासाठी आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला राजुरवाडी येथील एका शेतात बोलावले. तेथेच किसनचा गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

तिघांना अटक: या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बबलू उर्फ इजाज खान शब्बीर खान याच्यासह त्याचे साथीदार सागर रमेश मातकर आणि एका अल्पवयीन बालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी सक्तीने विचारपूस केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तिघांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उभविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास करण्यात आला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू पांडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पोलीस अंमलदार संतोष मुंदाणे, बळवंत दाबणे, प्रमोद शिरसाट, पंकज पाटे यांनी सहभाग घेतला.

पत्नीने दिली पतीची सुपारी: वसई जवळील नायगाव परिसरात पोलिसांना सापडलेल्या अद्यात इसमाच्या मृतदेहाचा अखेर 1 फेब्रुवारी, 2023 रोजी उलगडा झाला होता. मुंबईच्या गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका पत्नीने आपल्याच पतीची 1 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडविल्याचा धक्कादायक खुलासा झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपिंना अटक केली. कमरुद्दीन उस्मान अन्सारी असे मयत पतीचे नाव असून अशिया अन्सारी असे आरोपी पत्नीचे नाव आहे. गोरेगाव पूर्वेच्या भगत सिंग चाळीत हे दामपत्य राहत होते.

पत्नीने दिली सुपारी: पत्नी अशिया हिने तिच्या शेजारी राहणारे पती पत्नी बिलाल पठाण, सौफिया पठाण यांना एक लाख रुपयांची कमरुद्दीनला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यानुसार वसई जवळील नायगाव परिसरात त्याला नेवून दोघांनी धारदार शस्त्राने हत्या केली. तसेच झाडी झुडपात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. त्यानंतर कमरुद्दीनची पत्नी अशिया हिनेच तो बेपत्ता असल्याची तक्रार बांगूरनगर पोलीस ठाण्यात दिली.

हेही वाचा: Char Dham Yatra: केदारनाथ धाममध्ये जोरदार बर्फवृष्टी! ३ मे रोजी होणारी यात्राही पुढे ढकलली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.