ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो आमदार रवी राणा यांचा व्हॉट्सअॅप डीपी - congress

नवनीत राणा आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समार्थीत अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवार आहे. असे असताना आमदार रवी राणा यांचा व्हॉट्सअॅप डीपी मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेला फोटो आहे

आमदार रवी राणा
author img

By

Published : Mar 28, 2019, 4:58 AM IST

अमरावती - नवनीत राणा आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समार्थीत अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवार आहे. असे असताना आमदार रवी राणा यांचा व्हॉट्सअॅप डीपी मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेला फोटो आहे. तो आम्हाला खटकतो अशी खंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकऱ्यांच्या बैठकीत हास्यकल्लोळासह चर्चा रंगली.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पदाधिकऱ्यांच्या बैठकीला नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार यशमती ठाकूर, काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी आमदार खतीब यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आम्ही जात, धर्म न मानता समाजकार्य करणारे असून भविष्यात भाजपला कधीही साथ देणार नाही, असे आश्वासन बैठकीत दिले. बैठकीच्या समारोपाला बबलू देशमुख समोर आले आणि एक खंत व्यक्त करायची आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांचा व्हाट्सअॅप डीपी हा मुख्यमंत्र्यांसोबत आहे. हे आम्हाला खटकतं असे सांगितले.

त्यानंतर आमदार राणा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे असलेला त्यांचा मोबाईल फोन स्वतःकडे घेऊन यात असा कुठलाही डीपी नाही हे सर्वांसमोर दाखवले. यावेळी बबलू देशमुख यांनी माझ्याकडे रवी राणा यांचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यात व्हॅटसअॅप डीपीमध्ये रवी राणा आणि मुख्यमंत्री सोबत दिसत आहेत, असे मंचावरून दाखवले. यावेळी बैठकीत चांगलाच हास्यकल्लोळ झाला. आमदार राणा यांनी माझा मोबाईल क्रमांक तो नाही जो तुमच्याकडे आहे, असे बबलू देशमुख यांना म्हणत आता निवडणुकीत माझ्याविरोधात असे चुकीचे प्रकार सुरू झाले आहेत. आता मी फक्त बबलू देशमुखांसोबतच आहे असे म्हणताच बबलू देशमुख, यशोमती ठाकूर, नवनीत राणा सगळेच हास्य विनोदात रंगले.

Intro:नवनीत राणा आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समार्थीत उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवार असताना आमदार रवी राणा यांचा व्हॅटसअँप डीपी हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेला फोटो आहे. आणि आम्हाला हा खटकतो अशी खंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त करताच काँग्रेस पदाधिकऱ्यांचा बैठकीत हायकल्लोळासह चर्चा रंगली.

Body:लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पदाधिकऱ्यांच्या बैठकीला नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार यशमती ठाकूर, काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी आमदार खतीब यांचासह जिल्ह्यातील काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आम्ही जात, धर्म न मानता समाजकार्य करणारे असून भविष्यात भाजपला कधीही साथ देणार नाही असे आश्वासन बैठकीत दिले. बैठकीच्या समारोपाला बबलू देशमुख समोर आले आणि एक खंत व्यक्त करायची आहे असे म्हणत आमदार रवी राणा यांचा व्हाट्सअँप डीपी हा मुख्यमंत्र्यांसोबत आहे. हे आम्हाला खटकतं असे म्हणतात आमदार राणा यांनी त्यांच्या कार्यकर्त्याकडे असलेला त्यांचा मोबाईल फोन स्वतःकडे घेऊन यात असा कुठलाही डीपी नाही हे सर्वांसमोर दाखवले. यावेळी बबलू देशमुख यांनी माझ्याकडे रवी राणा यांचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यात व्हॅटसअँप डीपीमध्ये रवी राणा आणि मुख्यमंत्री सोबत दिसत आहेत असे मंचावरून दाखवले. यावेळी बैठकीत चांगलाच हस्यकल्लोळ झाला. आमदार राणा यांनी माझा मोबाईल क्रमांक तो नाही जो तुमच्याकडे आहे असे बबलू देशमुख यांना म्हणत आता निवडणुकीत माझ्याविरोधात असे चुकीचे प्रकार सुरू झाले आहेत . आता मी फक्त बाबलू देशमुखांसोबतच आहे असे म्हणताच बबलू देशमुख, यशोमती ठाकूर, नवनीत राणा सगळेच हास्य विनोदात रंगले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.