ETV Bharat / state

बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचा फरार ट्रस्टी तुषार आपटे अटकेत; 'एसआयटी'कडं करणार सुपूर्द - Badlapur Girls Sexual Assault Case - BADLAPUR GIRLS SEXUAL ASSAULT CASE

Badlapur Girls Sexual Assault Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या नराधमाचा खात्मा केला. त्यानंतर पोलिसांनी शाळेचे फरार ट्रस्टी तुषार आपटे आणि सचिव उदय कोतवाल यांच्याकडं आपला मोर्चा वळवला. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Badlapur Girls Sexual Assault Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 6:36 AM IST

Updated : Oct 3, 2024, 5:52 PM IST

ठाणे Badlapur Girls Sexual Assault Case : बदलापूर इथल्या एका विद्यालयात दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे याला अटक केल्यानंतर त्याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मागील दीड महिन्यापासून फरार असलेला शाळेचा ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांचा पोलीस शोध घेत होते. अखेर ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांना बेड्या ठोकण्यात ठाणे क्राईम ब्रँचला यश आलं आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना एसआयटी पथकाकडं वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे.

शाळेचा ट्रस्टी तुषार आपटे होता फरार : बदलापूर अल्पवयीन चिमुकल्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेनं अक्षय शिंदे याला अटक केली. मात्र शाळेचा ट्रस्टी तुषार आपटे आणि संस्थेचा सचिव उदय कोतवाल हे दोघं मागील दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर या प्रकरणात गुन्ह्यातील फरार आरोपींकडं पोलिसांनी मोर्चा वळवला. अखेर ठाणे गुन्हे शाखेनं तुषार आपटे आणि कोतवाल यांना अटक केली. त्यांच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटी टीमकडं सोपवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील अधिक माहिती ही फरार असलेल्या आरोपींना माहिती असल्याची शक्यता आहे. या दोघांच्या अटकेनं आता या वादग्रस्त प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरं समोर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

बदलापूर अत्याचार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. अक्षय शिंदेसह शाळेचे ट्रस्टी उदय कोतवाल, तुषार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका गुन्ह्यामध्ये तुषार आपटे, उदय कोतवाल यांना कल्याण न्यायालयानं जामीन मंजूर केला असून, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून, शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर करणार आहेत. - आरोपीचे वकील चंद्रकांत सोनवणे

दुसऱ्या प्रकरणात जामीन फेटाळला : या दोन्ही आरोपींना गुरुवारी दुपारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आरोपींतर्फे वकील चंद्रकांत सोनवणे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे आरोपींच्या जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला. न्यायालयानं दोन्ही आरोपींना एक गुन्ह्याच्या प्रकरणात तत्काळ जामीन मंजूर केला, तर याच गु्न्ह्यातील दुसऱ्या प्रकरणात जामीन फेटाळला. त्यामुळं पोलिसांनी दोन्ही आरोपींचा तत्काळ ताबा घेतला.

न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे : बदलालापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. मात्र या प्रकरणात शाळेचे विश्वस्त तुषार आपटे आणि सचिव उदय कोतवाल हे फरार होते. या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे या अर्जावर मंगळवारी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. या दोघांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला. याबाबत न्यायालयानं हे दोघं शाळेचे विश्वस्त आहेत, त्यांना जामीन दिल्यास ते शाळेतील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता असल्यानं त्यांना जामीन नाकारला, अशी माहिती या प्रकरणीतील वकिलांनी दिली. विशेष म्हणजे उच्च न्यायालयानं जामीन फेटाळताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा :

  1. अखेर सहा दिवसांनी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन; स्थानिकांनी केला विरोध - Akshay Shinde Body Buried
  2. बदलापूर प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला; पोलिसांना शोधण्यात अडचण काय? - Badlapur Rape Case
  3. पोलिसांवर बंदूक उचलली तर . . . , देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय शिंदे एन्काउंटरवर दिलं रोख'ठोक' उत्तर - Devendra Fadnavis On Encounter

Last Updated : Oct 3, 2024, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.