ETV Bharat / state

मोर्शी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; पाण्यामुळे शेजार धर्मात वाढला कलह - scarcity

गोराळा गावात दोन विंधन विहिरी होत्या, पण भूगर्भातीलच पाण्याची पातळी खोल गेल्याने या विंधन विहिरींमध्ये पाणी नाही. यामुळे ग्रामपंचायतीने दोन विहिरी अधिग्रहित केल्या असून त्यावरूनच गावाला हा पाणीपुरवठा होत आहे.

मोर्शी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; पाण्यामुळे शेजार धर्मात वाढला कलह
author img

By

Published : May 10, 2019, 3:10 PM IST

अमरावती - मोर्शी महामार्गावर पिंगळादेवी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोर्शी तालुक्यातील गोराळा गावात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेजार धर्म निभावणाऱ्या महिला आज एकमेकींविरोधात पाण्यासाठी नळावर भांडताना पाहायला मिळत आहेत. गावात सात दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होतो. जनावरांना पाणी प्यायला मिळावे म्हणून येथील शेतकरी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदुरा गावात दिवसातून दोन वेळा जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेतात.

मोर्शी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; पाण्यामुळे शेजार धर्मात वाढला कलह

मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या ओवरफ्लोवर सकाळपासूनच येथील नागरिकांची पाण्यासाठी गर्दी दिसते. त्यातही ते पाणी गढूळ असल्याच्या महिलांच्या तक्रारी आहे. गावात सात दिवसानंतर पाणी येते. भरून ठेवलेले पाणी तीन दिवसातच संपते. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना पुन्हा संघर्ष करावा लागत आहे.

या गावात दोन विंधन विहिरी होत्या, पण भूगर्भातीलच पाण्याची पातळी खोल गेल्याने या विंधन विहिरींमध्ये पाणी नाही. यामुळे ग्रामपंचायतीने दोन विहिरी अधिग्रहित केल्या असून त्यावरूनच गावाला हा पाणीपुरवठा होत आहे. गावाकाठी असलेल्या अंगणवाडीतील नळावर माहिलांची मोठी गर्दी ही पाणी भरण्यासाठी दिसते. पाण्याच्या टंचाईमुळे महिलांमध्ये पाणी मिळवण्यासाठी संघर्ष होत आहे. यातूनच त्यांच्यामध्ये भांडणही निर्माण होत आहे.

महिन्यापूर्वी एका खासगी कंत्राटदाराकडून एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. कंत्राटदाराने खोदलेल्या विंधन विहिरीला पाणी नसल्याने तो टँकर बंद झाला. गावाशेजारी एक किलोमीटरवर असलेल्या व खूप कमी पाणी असलेल्या विहिरीवरून महिलांना पाणी आणावे लागत आहे.

Intro:अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात
गोराळा गावात दुष्काळदाह,पाण्यामुळे वाढले शेजार धर्मात कलह

सात दिवसा आड होतो पाणीपुरवठा
---------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावती मोर्शी महामार्गावर पिंगळा देवी गडाच्या पायथ्याशी असलेल्या शेदीडशे उंबरठ्याच्या व साडेसहाशे लोकसंख्या असलेल्या मोर्शी तालुक्यातील गोराळा गावात पाणीटंचाई ने हाहाकार माजवलेला आहे.घराशेजारी ,कुडाला कुळ, आणी घराला घरं लागलेले शेजार धर्म निभावणार्या महिला आज एकमेकींन विरोधात पाण्यासाठी नळावर भांडताना पाहायला मिळतात गावात सात दिवसा आड पुरवठा होतो त्यामुळे इथल्या जनावरांनाही या भयंकर दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. माणसालाच प्यायला नसल्याने जनावरांची काय परस्थिती असणार या गावात दिसून येते बकऱ्यांना प्यायला मिळाव म्हणुन येथील शेतकरी या गावापासून तीन किलोमीटर वर असलेल्या नांदुरा या गावात दिवसातून दोन दा पाणी प्यायला न्याव्या लागतात.

Vo-1

गावच्या प्रथमच दर्शनीच दिसते की या गावात किती भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे.मोर्शी च्या अप्पर वर्धा धरणातून जानाऱ्या पाईप लाईनच्या ओहर फ्लो वर सकाळ पासूनच महिलांची ,येथील नागरिकांची पाण्यासाठी गर्दी दिसते.त्यातही ते पाणी गढूळ असल्याचे महिलांच्या तक्रारी आहे.गावात सात दिवसा नळ येतो त्यामुळे तो पाणीसाठा तीन दिवसातच संपला की पुन्हा पाण्यासाठी महिलांना रोजच संघर्ष करावा लागतो.

बाईट-1- महिला ग्रामस्थ

या गावात दोन विंधन विहरी होत्या पण भूगर्भातीलच पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या विंधन विहिरींच्या ही घशाला काही महिन्या पूर्वीच कोरड पडली .पर्यायाने ग्रामपंचायत ने दोन विहरी अधिग्रहित केल्या त्यावरूनच गावाला हा पाणीपुरवठा होत आहे.

बाईट-2 ग्रामस्थ महिला

गावाकाठी असलेल्या अंगणवाडीतील नळावर माहिलाची मोठी गर्दी ही पाणी भरण्यासाठी दिसते.कोणाला पाच गुंड ,कोणाला दोन, तर एखाद्या महिलेला एकही नाही अशी परिस्थिती असल्याने रोज एकमेकीच्या अंगणात बसणाऱ्या महीला एकमेकींन समोर पाण्यासाठी कंबरेचा पदर खोचतानाचे चित्र आहे. महिन्यापूर्वी एका खाजगी कंत्राट दाराकडून एका टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात होता पण कंत्राट दराने खोदलेल्या विंधन विहरीला पाणी नसल्याने तो टँकर बंद झाला.गावशेजारी 1 किलोमीटरवर असलेल्या व अखेरच्या घटका मोजणार्या काही विहरीवरून महिलांना पाणी आनाव लागत.

बाईट 3-महिला ग्रामस्थ

या गावाचे क्षेत्रफळ कमी असल्याने जलसंधारनाचे कामे झाले नाही,रोजगार हमी योजना व पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून थोडे फार या गावात नाला खोलीकरनाचे काम झाले आहे.परंतु या पाणीटंचाई वर ठोस उपाययोजना नसल्याने वगेल्या दोन तीन वर्षांपासून या गावात दुष्काळदाह परिस्थिती निर्माण झाली आहे.
-----------------------------------------Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.