ETV Bharat / state

आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण... वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्र सील - वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना

आरोग्य केंद्रात कार्यरत वडाळी परिसरातील आशा सेविका, तिवसा येथून येणारे आरोग्य कर्मचारी आणि जळकातून येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचीबाधा झाली. कोरोबाधित तिघांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

wadali-primary-health-center-seal-due-to-corona-at-amravati
वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्र सील
author img

By

Published : Jul 15, 2020, 2:19 PM IST

अमरावती-अमरावती शहरातील गावठाण वडाळी परिसरात अमरावती महापालिकेचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणच्या आशा सेविकेसह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे आरोग्य केंद्र सील करण्यात आले आहे. त्यामुळे परिररातील रुग्णांची आता तारांबळ झाली आहे.

वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन आरोग्य अधिकाऱ्यांसह एकूण 33 आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. वडाळी परिसराची एकूण लोकसंख्या 20 हजारांच्या घरात आहे. वडाळीसह लगतच्या राह्यलनगर, बिच्चू टेकडी, चपराशीपुरा या भागातूनही अनेक नागरिक या केंद्रात उपचारासाठी येतात. अवघ्या 10 रुपयात याठिकाणी उपचार मिळतो. मात्र, याठिकाणचे कर्मचारी कारोनाबाधित आढळल्याने हे आरोग्य केंद्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्र सील

दरम्यान, आरोग्य केंद्रात कार्यरत वडाळी परिसरातील आशा सेविका, तिवसा येथून येणारे आरोग्य कर्मचारी आणि जळकातून येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचीबाधा झाली. कोरोबाधित तिघांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर 30 जणांना विविध ठिकाणच्या विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

वडाळी प्रभागाचे नगरसेवक आशिष गावांडे यांनी वडाळी परिसरातील नागरिकांसाठी तत्काळ तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदना सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नगरसेवक सपना ठाकूर यांनी आमच्या वडाळी परिसरासह लगतच्या भागातून गरीब रुग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद झाल्याने महापालिका प्रशासनाने वडाळी परिसरात फिरत्या रुग्णालयाची व्यवस्था करायला हवी असे सांगितले.

वडाळीचे प्राथमिक आरोग्य केंद्र एक, दोन दिवस बंद राहील मात्र आम्ही इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुन्हा आरोग्य केंद्र सुरू करू, असे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.