ETV Bharat / state

Amravati Waterman : भर उन्हात रस्त्याने जाणाऱ्या वाटसरुंची तहान भागवणारा 'वॉटरमॅन' - विवेक चर्जन वॉटरमॅन अमरावती

मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत ते रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाटसरुंना पाणी वाटण्याचे काम ( distributing water to the people ) करत आहे. इतकच नाही तर ते परिसरातील जंगलातही पशु-पक्षासाठी जलपात्र ( Water containers for animals and birds in Pohra Chirodi forest ) ठेवतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत ते आता परिसरात 'वॉटरमॅन' ( Amravati Waterman ) या नावाने ओळखले जावू लागले आहे.

waterman
waterman
author img

By

Published : May 3, 2022, 8:05 PM IST

अमरावती - अमरावती ते चांदुर रेल्वे हा मार्ग पूर्णतः पोहरा, चिरोडी या जंगलातून जातो. भर उन्हाळ्यात या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची तृष्णा तृप्ती व्हावी, यासाठी गेली 26 वर्षांपासून या मार्गावर पाणी वाटप करणारे विवेक चर्जन ( Vivek Charjan Amravati ) आता सर्वांना परिचयाचे झाले आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत ते रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाटसरुंना पाणी वाटण्याचे काम ( distributing water to the people ) करत आहे. इतकच नाही तर ते परिसरातील जंगलातही पशु-पक्षासाठी जलपात्र ( Water containers for animals and birds in Pohra Chirodi forest ) ठेवतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत ते आता परिसरात 'वॉटरमॅन' ( Amravati Waterman ) या नावाने ओळखले जावू लागले आहे.

वाटसरुंची तहान भागविणारा वॉटरमॅन

असा सुरु होतो दिवस : अमरावती ते चांदुर रेल्वे महामार्ग आता बऱ्यापैकी विस्तीर्ण झाला असला तरी पंचवीस-सव्वीस वर्षापूर्वी हा मार्ग अरुंद होता. मात्र या मार्गावर पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू आहे. सुमारे 15 ते 20 किलोमीटरचा भाग जंगलातून जात असून उन्हाळ्यात हा मार्ग झाडांवरील पानगळतीमुळे रुक्ष होतो. या मार्गावर वसलेल्या अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. दूध उत्पादक अमरावती शहराच्या दिशेने मोठ्या संख्येने दुचाकी किंवा सायकलने जातात. उन्हाळ्यात 42, 43 डिग्रीपर्यंत तापमान वाढले असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळावे, आपण त्यांना हे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे मनात आले आणि 26 वर्षापासून या मार्गावरून जाणाऱ्याला थंडगार पाणी पाजण्याचे काम मी हाती घेतले. सकाळी 10 वाजल्यापासून या कार्याला मी सुरुवात करतो, अशी भावना विवेक चर्जन यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली.

जंगलात लावले जलपात्र : पोहरा, चिरोडीच्या जंगलात विविध प्रजातीचे अनेक पक्षी आहेत. या परिसरात असणारे लहान-मोठे तलाव उन्हाळ्यात कोरडे होतात. यामुळे पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. माणसांप्रमाणेच या जंगलातील पक्षांनाही पिण्यासाठी पाणी मिळावे, या उद्देशाने विवेक चर्जन यांनी स्वतः या जंगल परिसरातील अनेक झाडांवर जवळपास 35 ते 40 जलपात्र लावले आहेत. सकाळी दहा वाजता विवेक चार्जन हे घरातून निघाल्यावर या मार्गावर लावलेल्या जलपात्रांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी भरतात. दुपारी तीन ते सहा वाजे दरम्यान सुद्धा पक्षांसाठी हे जल अपात्र भरण्याचे काम भर उन्हात विवेक चर्जन नित्याने करतात.

कुटुंबाचा असा मिळतो सहकार्य : बासलापूर गावात केवळ एक एकर शेती हेच विवेक चर्जन यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. पत्नी आणि मुलगा शेतात मजुरी करतात. विशेष म्हणजे विवेक चर्जन यांचा मुलगा त्यांना त्यांच्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी रोज 200 रुपये देतो. दुचाकीत पेट्रोल टाकल्यावर तहानलेल्या नागरिकांना पाणी पाजण्याचे काम विवेक चर्जन यांचे सुरू होते. बासलापूर गावापासून अमरावती शहरालगत असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिर तर कधी राज्य राखीव पोलीस दल वसाहतीपर्यंत विवेक चर्जन हे या मार्गावरून जाणाऱ्या तहानलेल्या व्यक्तींना पाणी पाजताना नेहमीच दिसतात. या मार्गावरून नेहमी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता विवेक चर्जन हे परिचयाचे झाले असून त्यांची ओळख वॉटरमॅन म्हणून झाली आहे.

वॉटरमॅनच्या कार्याची समाजाने घेतली दखल : वॉटरमॅन अशी ओळख असणाऱ्या विवेक चर्जन यांच्या अतिशय महत्त्वपूर्ण कामाची दखल समाजातील विविध घटकांनी घेतली आहे. त्यांच्या या कार्याची दखल लिम्का बुकने सुद्धा घेतली आहे. 2020 चा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सामाजिक कार्याचा पुरस्कार देखील विवेक चर्जन यांना प्रदान करण्यात आला आहे. यासह आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने देखील विवेक सर्जन यांचे गौरव करण्यात आले आहे.

हेही वाचा - Shiv Jayanti In Karad : कराडमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; महिलांनी काढली मोटरसायकल रॅली, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.