ETV Bharat / state

भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी आघाडीच्या नवनीत राणांसमोर जोडले हात, फोटो व्हायरल - troll

ज्या नवनीत राणांना पराभूत करण्याच्या हेतूने भाजपने दिवसाची रात्र केली. त्याच नवनीत राणांसमोर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी कंबरेपासून वाकत आदरपूर्वक दोन हात जोडून नमस्कार केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिनेश सुर्यवंशींनी नवनीत राणांसमोर जोडले हात
author img

By

Published : Apr 26, 2019, 10:52 AM IST

अमरावती - स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी व अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समोर भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी दोन्ही हात जोडून आदरपूर्वक वाकून नमस्कार केला आहे. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे, भाजप जिल्ह्याध्यक्ष सुर्यवंशी यांना नेटकऱ्यांनी पुन्हा ट्रोल केलं आहे.

अमरावतीच्या स्थानिक राजकारणात भाजप आणि आमदार रवी राणा यांच्यातील अंतर्गत वैर संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. गतवर्षी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्या वादात भाजप जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी उडी घेत थेट आमदार रवी राणा यांच्याशी वाद ओढून घेतला होता. ज्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी भाजपने जंग जंग पछडल्याचे बोलले जाते.

परंतु ज्या नवनीत राणांना पराभूत करण्याच्या हेतूने भाजपने दिवसाची रात्र केली. त्याच नवनीत राणांसमोर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी कंबरेपासून वाकत आदरपूर्वक दोन हात जोडून नमस्कार केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सुर्यवंशी पुन्हा एकदा समाज माध्यमावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. या फोटोत रिपाइंचे राजेंद्र गवई आणि काँग्रेसचे सुरेश रतावा दिसत आहेत. या फोटोवर समाज माध्यमातून चांगलीच टीका टिप्पणी होत आहे.

राजकारणात कायमस्वरूपी कोणीच कोणाचा शत्रू आणि मित्रही नसतो. कदाचित हा फोटो जुनाही असू शकतो. पण व्हायरल झालेला हा फोटो मात्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याआधी दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. तो वाद शांत झाला असतानाच आता या फोटोने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मात्र आता दिनेश सुर्यवंशी या फोटोवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Intro:आता भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशीनी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समोर हाथ जोडल्याचा फोटो व्हायरल

अमरावती भाजपा अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी समाज माध्यमावर पुन्हा ट्रोल
-----------------------------------------------
अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत व ग्रामीण भाजपचे जिल्ह्याध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांच्या तथाकथित ऑडीओ क्लिप ने अमरावती जिल्हाच्या राजकारणात खळबळ उडाली होती.या वादावर पडदा टाकण्यासाठी दिनेश सूर्यवंशी यांनी बुधवारीच तातडीने पत्रकार परिषद घेऊन क्लिप मधील आवाज माझाच असल्याचे म्हटले ,व क्लिप मध्ये छेडछाड झाल्याचेही ते बोलले होते.परंतु पुढील आवाज हा रावसाहेब शेखावत यांचा नसल्याचा दावा त्यांनी केला होता.तर तो माझा आवाज नसून भाजप नेत्यांनी मला पक्ष अंतर्गत बदनाम करण्यासाठी हे डाव रचल्याचा आरोप काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांनी केला होता.तेव्हाच या संपूर्ण वादावर दोन्ही नेत्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.या ऑडिओ क्लिप ने जिल्ह्यातील राजकारणात तीन दिवसांपासून खलबत सुरू असतानाच युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी व अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समोर भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी दोन्ही हात जोडत आदरपूर्वक वाकून नमस्कार केल्याचा फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल झाल्याने भाजप जिल्ह्याध्यक्ष सुर्यवंशी यांना नेटकऱ्यांनी पुन्हा ट्रोल केलं आहे.
अमरावतीच्या स्थानिक राजकारणात भाजपा आणि आमदार रवी राणा यांच्यातील अंतर्गत वैर जिल्ह्याला माहीत आहे.गतवर्षी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्या वादात भाजप जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी उडी घेत थेट आमदार रवी राणा याच्याशी वाद ओढून घेतला होता.तो वाद भाजप कार्यकर्ते आणी युवा स्वाभिमान कार्यकर्ते यांच्यात हाणामारी पर्यंत गेला होता.अमरावती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी भाजपाने जंग जंग पछडल्याचे बोलल्या जाते..परंतु ज्या नवनीत राणांना पराभूत करण्यासाठी भाजपने दिवसाची रात्र केली हे अशी चर्चा आहे. त्याच नवनीत राणांना समोर कमरेपासून वाकत आदरपूर्वक दोन हात जोडून भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी नमस्कार केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी पुन्हा समाज माध्यमावर चांगलेच ट्रोल झाले आहे.या फोटोत रिपाइं चे राजेंद्र गवई व काँग्रेसचे सुरेश रतावा दिसत आहेत. या फोटोवर समाज माध्यमातून चांगलीच टीका टिपणी होत आहे.
राजकारणात कायमस्वरूपी कोणीच कोणाचा शत्रू नसतो तर मित्रही नसतो. कदाचित हा फोटो जुनाही असू शकतो. पण व्हायरल झालेला हा फोटो मात्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑडिओ क्लिपने अमरावती जिल्हात खळबळ उडवून दिली होती तो वाद शांत झाला असतांना या फोटोने पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटून दिले आहे,मात्र आता दिनेश सुर्यवंशी या फोटोवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औतुक्याचे ठरेल.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.