ETV Bharat / state

Young Scientist Ajinkya Kottawar परसेंटेज ओरिएंटेड नव्हे स्किल ओरिएंटेड व्हा, विदर्भाचा फुणसुक वांगडू अजिंक्य कोत्तावारने उलगडला यशाचा प्रवास - अजिंक्य कोत्तावार

विदर्भाचा विदर्भाचा फुणसुक वांगडू ( Vidarbha Phunsukh Wangdu Ajinkya Kottawar ) म्हणून अजिंक्य कोत्तावार या तरुणाची ओळख आहे. त्याने आतापर्यंत 24 पेटंट मिळवले आहेत. त्याने पालकांनी पर्सेंटेज ओरिएंटेड ( Be skill oriented not percentage oriented Said Ajinkya Kottawar ) विचार न करता स्किल ओरिएंटेड विचार करायला हवा आणि यासाठीच लहान मुलांचे कुतूहल जपायला हवे असे, स्पष्ट केले. अजिंक्य कोत्तावार याने ईटीव्ही भारतशी खास गप्पाही केल्या.

Young Scientist Ajinkya Kottawar
विदर्भाचा फुणसुक वांगडू अजिंक्य कोत्तावार
author img

By

Published : Dec 31, 2022, 4:33 PM IST

Updated : Dec 31, 2022, 5:49 PM IST

अमरावती - लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कुतूहल असते. जितके मुले लहान तितके त्यांच्यात कुतूहल अधिक असते. हे का होते असे का होते ते का होते असे विविध प्रकारचे प्रश्न लहान मुले कुतूहलाने विचारत असतात. या लहान मुलांची बुद्धी आपण खंडित करायला नको. पालकांनी पर्सेंटेज ओरिएंटेड ( Be skill oriented not percentage oriented Said Ajinkya Kottawar ) विचार न करता स्किल ओरिएंटेड विचार करायला हवा आणि यासाठीच लहान मुलांचे कुतूहल जपायला हवे असे विदर्भातील फुणसुक वांगडू ( Vidarbha Phunsukh Wangdu Ajinkya Kottawar ) आणि महाराष्ट्राचा पेटंटवीर म्हणून प्रसिद्ध असलेले अजिंक्य कोत्तावार यांनी स्पष्ट केले. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनासाठी अजिंक्य कोत्तावार ( Ajinkya Kottawar patent On Turmeric ) आले असताना त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला.

परसेंटेज ओरिएंटेड नव्हे स्किल ओरिएंटेड व्हा

समस्यांवर उत्तर देणारा व्यक्ती म्हणजे वैज्ञानिक वैज्ञानिक म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर आपल्या आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडतात, त्या आपण पाहतो ज्या काही समस्यांचा सामना करतो, त्या सर्व गोष्टींवर उत्तर देणारा व्यक्ती म्हणजे वैज्ञानिक होय. वैज्ञानिक नावाचे कुठलेही क्षेत्र आपल्या अवतीभवती नाही. विज्ञान कला वाणिज्य, अभियांत्रिकी वैद्यकीय अशा विविध विषयाच्या पदवी आहेत. मात्र वैज्ञानिक नावाची कुठलीही पदवी नाही. मात्र प्रत्येक पदवीमध्ये वैज्ञानिक आहेत, असे अजिंक्य कोत्तावर ( Ajinkya Kottawar Speech ) यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांची आवड ओळखा अनेकदा आपण छोट्याशा गावातून आल्यामुळे विद्यार्थी बोलायला घाबरतात. आपल्याला इंग्रजी भाषा येत नाही म्हणून देखील त्यांच्यात न्यूनगंडाची ( Be skill oriented not percentage oriented Said Ajinkya Kottawar )भावना निर्माण होते. तर असा प्रकार होऊ न देता आपली आवड नेमकी कशात आहे. ती आवड जोपासण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायला हवा. आज अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राकडे मोठी गर्दी जाताना दिसते आहे. गर्दीच्या मागे न लागता आपली आवड नेमकी कशात आहे, हे विद्यार्थ्यांनी ओळखायला हवे. दहाव्या वर्गापर्यंतच विद्यार्थी आपला नेमका कल कशात आहे, हे ओळखू शकतात. एखादा विद्यार्थ्याला इतिहास आवडू शकतो, कोणाला भूगोलची आवड असू शकते, अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार आपल्या करिअरच्या संधी नेमक्या कुठे आहेत, हे विद्यार्थ्यांना दहाव्या वर्गापर्यंतच कळू शकते. संशोधन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या अवतीभवती असणाऱ्या समस्यांवर आपण एखादा पर्याय सुचवला तर तेच संशोधन आहे, असे अजिंक्य कोत्तावार यांनी स्पष्ट केले. तुम्ही ज्या गावात राहता ज्या परिसरात राहता त्या भागात ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत त्या लिहून ठेवा आणि अशासारख्याच अडचणी आणि समस्यांवर इतर भागात काही पर्याय निघाले आहेत, का हे शोधा आणि कशाप्रकारे आपल्या गावातील अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करा असे वेगवेगळे प्रयोग आपण स्वतःच करायला हवेत. जोपर्यंत आपण अशा स्वरूपाचे प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत आपल्यामधील संशोधक जागा होऊ शकणार नाही, असे देखील अजिंक्य कोत्तावार म्हणाले.

नाविन्यपूर्ण शेतीकडे वळा भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि दहाव्या वर्गापर्यंत मला एकही असा विद्यार्थी सापडला नाही, ज्याला शेतकरी व्हायचे आहे. तर आजच्या युवा पिढीने आधुनिक शेतीकडे वळणे अतिशय आवश्यक आहे. आपण आज देखील पारंपरिक पद्धतीने शेती करतो आहे. मात्र आज नाविन्यपूर्ण शेती करण्याची गरज आहे. शेतीमध्ये संशोधन ( Ajinkya Kottawar Speech ) होण्याची देखील अत्यंत गरज आहे. आजची युवा पिढी जोपर्यंत शेतीकडे वळणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास देखील होऊ शकणार नाही. आज चीन आणि इजराइल सारखे देश शेतीमध्ये प्रचंड प्रगती करीत आहेत. अनेक छोटे छोटे देश ज्या देशात पाणी नाही माती नाही, ते देश देखील कृषी क्षेत्रात मोठी झेप घेत आहेत. मग आपला भारत देश कृषी क्षेत्रात( Indian Agriculture Field ) का म्हणून मागे राहायला हवा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेतीची कामे नेमकी कशी होतात, हे शिकायला हवे ग्रामीण भागाकडे वळायला हवे. सगळे काही शहरातच आहे असे अजिबात नाही. संशोधनाला सर्वात मोठी संधी ही छोट्याशा गावातूनच मिळते. कारण गावांमध्ये अनेक समस्या आहेत. त्यामुळे जितक्या जास्त समस्या इतके अधिक पर्याय त्यावर शोधता येतात. त्यामुळे मुलांनी आपल्या परिसरातील छोट्या मोठ्या समस्या ओळखून त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न करायला हवा असे देखील अजिंक्य कोत्तावार यांनी सांगितले.

हळदीमध्ये घेतले 11 पेटंट शेतीमध्ये मला पहिले पासूनच आवड होती. शेती क्षेत्राची आवड असणारा आमचा खास ग्रुप तयार झाला. असा ग्रुप ऑफ कंपनीने आम्हाला शेती क्षेत्रातील संशोधनाबाबतची संधी दिली. यावर्षी आम्ही हळदीमध्ये 18 पेटंट घेतले आहेत. हळद उत्पादनात भारत सर्वात मोठा देश आहे. असे असताना आपण आज केवळ कच्चामाल म्हणजे हळद पावडर दुसऱ्या देशांना पाठवतो. हळदीमध्ये औषधी गुण असल्याचे जगमान्य झाले आहे. आपण हळदीमधील असे औषधी गुण इतर देशांना पुरवले तर आपल्याला दहा ते पंधरा पट किंमत अधिक मिळू शकते. मग आपण ते का नाही करावे असा विचार आमच्या मनात आला आणि तिथून छोट्या छोट्या प्रयोगाने आम्ही सुरुवात केली. त्यानंतर हळदीचा अर्क कसा काढावा किंवा आम्ही हळदीचे असे पीक तयार केले ज्याद्वारे दहा पट हळदीचे उत्पादन मिळू शकते. सर्वसामान्य हळदीच्या ( Ajinkya Kottawar patent On Turmeric ) झाडाला एक किलो हळद लागत असेल तर आम्ही निर्माण केलेल्या झाडाला दहा ते पंधरा किलो हळद लागते. असे नवीन प्रयोग आम्ही हळदीमध्ये सुरू केलेत. हळदीपासून आम्ही टूथपेस्ट निर्माण केली ती नुकतीच बाजारात आली आहे. असे नवे संशोधन आम्ही करतो आहे. या संशोधन कार्यात आम्हाला सुदैवाने अश्फाक पिंजारी, मिलन शहा, डॉ. प्रशांत झाडे, भूपेंद्र कुलकर्णी आणि हळदीचे जनक डॉ. रघुनाथ माशेलकर हे सुद्धा आमच्या सोबत या संशोधनात काम करीत आहेत. इतर देशात केवळ हळदच नव्हे तर हळदीपासून तयार होणारे औषध पुरवठा करण्याचे काम आम्ही करीत असल्याचे अजिंक्य कोत्तावार म्हणाले.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद अजिंक्य कोत्तावार यांनी अमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयातील चिमुकल्यांसह या ठिकाणी आयोजित विज्ञान प्रदर्शनीत सहभागी झालेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुठल्याही नव्या संशोधनासाठी मी निश्चित मदत करेल, असे आश्वासन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. कुठल्याही प्रयोगासंदर्भात थेट माझ्याशी संवाद साधावा, असे आवाहन करीत अजिंक्य कोत्तावार यांनी विद्यार्थ्यांना आपला संपर्क क्रमांक देखील दिला.

Last Updated : Dec 31, 2022, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.