ETV Bharat / state

चिखलदऱ्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांचे नुकसान - चिखलदरा गारपीट बातमी

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व परिसरातदेखील पावसाने हजेरी लावली असून, गारपीटदेखील झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच काढणीला आलेला गहुही पावसामुळे भिजला आहे.

amravati rain
चिखलदऱ्यात अवकाळी पावसासह गारपीट
author img

By

Published : Mar 18, 2021, 8:15 PM IST

Updated : Mar 18, 2021, 9:17 PM IST

अमरावती - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अेमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व परिसरातदेखील पावसाने हजेरी लावली असून, गारपीटदेखील झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच काढणीला आलेला गहुही पावसामुळे भिजला आहे.

चिखलदऱ्यात अवकाळी पावसासह गारपीट

हेही वाचा - उद्धव ठाकरेंना पैसे वसुलीसाठी माणूस हवा होता; किरीट सोमैय्यांचा खळबळजनक आरोप

वातावरणात गारवा

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाच वाजताच्या दरम्यान चिखलदरा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे चिखलदरामध्ये अनेक ठिकाणी गारांचे ढीग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

हेही वाचा - दीदी बोले 'खेला होबे' बीजेपी बोले 'विकास होबे'; मोदींचा ममतांवर हल्लाबोल

21 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज

कर्नाटक ते मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे वातावरणाच्या मधल्या थरात वाहणारे बाष्पयुक्त पश्चिमी वारे आणि खालच्या पातळीवर पूर्वेकडून वाहणारे वारे यांच्या संयोगातून विदर्भात 21 मार्चपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य भारतात २४ तारखेपर्यंत ढगाळ वातावरणाचा तसेच पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

Last Updated : Mar 18, 2021, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.