ETV Bharat / state

Har Ghar Tiranga Initiative in Amaravati : 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत अमरावती जिल्ह्यात साडेपाच लाख घरांवर फडकणार तिरंगा - Azadi Ka Amrit Mahotsav

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने, देशभर अमृत महोत्सव साजरा करण्याचे नियोजन आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा परिषद( Amravati Zilla Parishad ), महानगरपालिका तथा जिल्हा प्रशासनाने पथनाट्य आणि इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भागात 4 लाख 75 हजार, तर महापालिका क्षेत्रात 90 हजार घरांवर तिरंगा फडकवण्याचे नियोजन केले आहे. शासनाचे निर्देशाप्रमाणे प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Har Ghar Tiranga Initiative in Amaravati
हर घर तिरंगा मोहीम
author img

By

Published : Aug 6, 2022, 11:22 AM IST

Updated : Aug 6, 2022, 12:01 PM IST

अमरावती : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्टदरम्यान 'हर घर तिरंगा' उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील साडेपाच लाखांपेक्षा अधिक घरांवर तिरंगा फडकणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन घेत आहे आढावा.

जिल्हा प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती : जिल्हा परिषद ( Amravati Zilla Parishad ), महानगरपालिका तथा जिल्हा प्रशासनाने पथनाट्य आणि इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भागात 4 लाख 75 हजार, तर महापालिका क्षेत्रात 90 हजार घरांवर तिरंगा फडकवण्याचे नियोजन केले आहे. शासनाचे निर्देशाप्रमाणे प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

विविध माध्यमांतून अमृतमहोत्सवसंदर्भात जनजागृती : या संदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी कार्यक्रमाचे स्वरूप, अंमलबजावणी यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. 'हर घर तिरंगा' मोहीम यशस्वी करण्यासाठी विविध माध्यमातून प्रभावी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही तिरंगा फडकणार आहे. जिल्ह्यात एकूण 14 पंचायत समित्या आहेत. या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील 4 लाख 75 हजार 710 घरांवर तसेच विविध शासकीय कार्यालय, आस्थापना, शैक्षणिक संकुल आदींवर तिरंगा फडकवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्यातील विविध भागांत हर घर तिरंगा मोहीम : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ( Pune Mnc Har Ghar Tiranga initiative ) महापालिकेकडून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत 5 लाख तिरंग्यांचे विनामुल्य ( Har Ghar Tiranga Pune news ) वाटप केले जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३०० केंद्रही त्यासाठी करण्यात आली आहेत. आपल्या ध्वजाचा ( Har Ghar Tiranga initiative Pune mnc ) अधिक सन्मान करण्यासाठी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' उपक्रमांंतर्गत केंद्रीय गृहमंत्र्यांनी 'हर घर तिरंगा' कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. या अंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभर हा उपक्रम घराघरात पोहचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकराकडून विविध संस्थाच्या माध्यामातून जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत.

हर घर तिरंगा मोहीम मुंबई : केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, 'हर घर तिरंगा' उपक्रमात प्रत्येक घरी, प्रत्येक इमारत तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी स्वेच्छेने तिरंगा राष्ट्रध्वज फडकवावा म्हणून त्यांना प्रोत्साहित करावयाचे आहे ( Encourage Citizens To Hoist National Flag ). या अनुषंगाने, व्यापार, व्यवसाय, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांमध्ये विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांची तसेच स्वयंसहाय्यता गट, बचत गट आणि इतर क्षेत्रांमधील स्वयंसेवक अशी निरनिराळ्या घटकांची मदत घेवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अभियानामध्ये सहभागी होणाऱया कुटुंबे, घरे, इमारती यांची संख्या निश्चित करुन त्यानुसार पालिकेकडून ध्वज उपलब्ध करून दिले जात आहेत. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातून ३५ लाख निवासस्थाने व विविध आस्थापनामध्ये सुमारे ५० लाख तिरंगा ध्वजाचे विनामूल्य वाटप केले जात आहे. या अभियानाला व्यापक लोकसहभाग मिळावा या दृष्टीने विविध क्षेत्रांमधील संस्थांसह, स्वयंसहाय्यता गट, बचत गट, स्वयंसेवक यांचेदेखील सहाय्य घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

हेही वाचा : Shinde Government Cabinet Expansion : राज्यात मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे वर्ग, मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे सरकारची कसरत

Last Updated : Aug 6, 2022, 12:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.