ETV Bharat / state

Nitesh Rane on Kolhapur Riot : दंगलीमागे उद्धव ठाकरेंचा हात त्यांची नार्को टेस्ट करा सत्य बाहेर येईल : आमदार नितेश राणे - कोल्हापूर दंगल

राज्यात होणाऱ्या दंगलीमागे उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते अमवरावतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

भाजप आमदार नितेश राणे
भाजप आमदार नितेश राणे
author img

By

Published : Jun 10, 2023, 1:59 PM IST

Updated : Jun 10, 2023, 3:28 PM IST

अमरावती : औरंगजेबचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवल्यानंतर कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. होता. याप्रकरणावरुन राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. दरम्यान अमरावतीत आलेल्या नितेश राणे यांनी राज्यात दंगली होण्यामागे उद्घधव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. उद्धव ठाकरेंना राज्यात दंगली व्हाव्यात हे नेहमीच वाटत असते. मिरजच्या दंगलीमागेही त्यांचाच हात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या आरोपामुळे राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे.

पत्रकार परिषदेत केला आरोप : राज्यात दंगली व्हाव्यात,असे उद्धव ठाकरेंना नेहमीच वाटत आले आहे. 2004 -2010 मध्ये झालेल्या दंगली या उद्धव ठाकरेंनी घडवून आणल्या होत्या. मिरजच्या दंगलीमागे सुद्धा उद्धव ठाकरेच होते. आता सुद्धा राज्यात दंगली घडविण्यामागे उद्धव ठाकरे हेच असून त्यांची नार्को टेस्ट केली तर ते याबाबत स्वतः सांगतील असे आमदार नितेश राणे यांनी अमरावती पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

...त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळणे ही दुर्दैवी बाब आहे. मात्र त्यांना धमकी देणारा हा अमरावती शहरातला आमचा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे आता सांगण्यात येत आहे. पोलिसांनी अद्याप कुठलीही चौकशी केली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेत्यांनी आमच्या कार्यकर्त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. दाऊद इब्राहिमला साथ देणाऱ्या नवाब मलिक यांच्याबाबत आपुलकी आणि प्रेम ते लोक बाळगू शकतात.मग आम्ही आमच्या कार्यकर्त्याची पाठराखण करणे काही गैर नाही, असे देखील आमदार नितेश राणे म्हणाले.

शरद पवारांना मी आलेल्या धमकीच्या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यांना निश्चितच शिक्षा होईल. हे सरकार उद्धव ठाकरेचे नाही आता आमची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी दक्ष आहेत. - नितेश राणे , भाजप आमदार.

संजय राऊतांना देण्यामागे आदित्य ठाकरे : संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यांना अशी धमकी आदित्य ठाकरे शिवाय दुसरा कोणी देऊ शकत नाही. ठाकरेंच्या घरी नोकरी करणारा संजय राऊत हा आदित्य ठाकरे यांना नको आहे, असे देखील आमदार नितेश राणे म्हणाले.

हिंदूंवर प्रेम करण्याचा राष्ट्रवादीला सल्ला : आज राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस आहे, या पर्वावर त्यांच्या घड्याळीचे काटे व्यवस्थित चालावे, अशी अपेक्षा मी करतो. ज्याप्रमाणे इतरांविषयी आपुलकी बाळगता येते. त्याप्रमाणेच आता हिंदूंवरही राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेम करावे, अशी अपेक्षा बाळगून त्यांना शुभेच्छा देतो - आमदार, नितेश राणे .

औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणार्‍यांना धडा शिकवा : दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनवीत राणा यांनी ही कोल्हापूर दंगली मागील आरोपीला शोधून त्याला शिक्षा करावी अशी मागणी केली. कोल्हापूर दंगलीच्या मास्टरमाईंडला शोधून त्यांना तातडीने अटक करावी. शिवाजी महाराजांच्या राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण यापुढे सहन केले जाणार नाही, अशी तंबी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. या महाराष्ट्र राज्यात औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणार्‍यांना धडाच शिकवला पाहिजे अशी प्रतिक्रिया राणा यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली.

हेही वाचा -

  1. Nitesh Rane in Nashik : नितेश राणेंनी केली त्र्यंबकराजांची महाआरती, राजकारण पुन्हा तापणार ?
  2. Serious Allegations Against Thackeray : ठाकरे कुटुंबाकडून वसूल केली जाते खंडणी, भाजपच्या 'या' आमदाराने केला मोठा गौप्यस्फोट
  3. Kolhapur Bandh: कोल्हापूर बंदमध्ये तणावाचे वातावरण? 'अशी' आहे आंदोलन स्थळावरील परिस्थिती

आमदार नितेश राणे

Last Updated : Jun 10, 2023, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.