अमरावती - कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्यावर पोहोचल्याने अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आता 202 झाली असून, रामनगर वस्तीतही कोरोनाची लागण झाली आहे. जुन्या महामार्गाला लागून असणाऱ्या फ्रेझरपुरा भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
शुक्रवारी अमरावतीत एकूण 11 नवे कोरोनाबधित आढळून आले आहेत. फ्रेझरपुरा परिसरात 40 वर्षीय पुरुष आणि 30 आणि 21 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. रामनगर हा परिसर शहराच्या मध्यवस्तीत असून, या भागात 65 वर्षाच्या पुरुषाला कोरोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर परिसरात चिंतेचे वातावरण होते.
आज सर्वाधिक 7 कोरोना रुग्ण हे रातनगंज परिसरात आढळून आले आहेत. 45 , 60, 36, वर्ष वयाच्या पुरुषांसह 5 वर्षाचा चिमुकला आणि 45, 26 आणि 29 वर्ष वय असलेल्या तीन महिला या रातनगंज परिसरात कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीत आता कोरोनाबधितांची संख्या 202 वर पोचली असून, आता शहराच्या विविध भागात कोरोना रुग्ण आढळत असल्याने अमरावतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.