ETV Bharat / state

अमरावती : पांढरी गावालगत ट्रक-कारचा अपघात, दोघांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील अंजनगांव-परतवाडा महामार्गावर बुधवारी (दि. 8 सप्टेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ट्रक व चारचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका महीलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीची प्राणज्योत उपचारासाठी अमरावती येथे नेत असतांना रुग्णवाहिकेतच मालवली. डॉ. प्रमोद निपाणे आणि ललिता चव्हाण, असे मृतांची नावे असून हे दोघेही अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहेत.

दोघांचा मृत्यू
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 8, 2021, 8:57 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील अंजनगांव-परतवाडा महामार्गावर बुधवारी (दि. 8 सप्टेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ट्रक व चारचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका महीलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीची प्राणज्योत उपचारासाठी अमरावती येथे नेत असतांना रुग्णवाहिकेतच मालवली. डॉ. प्रमोद निपाणे आणि ललिता चव्हाण, असे मृतांची नावे असून हे दोघेही अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहेत.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन

सुमारे पन्नास फूट चारचाकी वाहन ट्रकने नेले फरफटत

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंजनगांव सूर्जी येथील मेडीकल चालक व पाणी फाउंडेशनचे कार्यकर्ते डॉ. प्रमोद निपाणे हे अचलपूर येथील अंगणवाडी सेविकांच्या कार्यक्रमासाठी स्वतःच्या चारचाकी (एम एच 27 बी व्ही 2012)ने अचलपूर येथे जात होते. त्यांच्या सोबत सुर्जी अंजनगांव येथील अंगणवाडी सेवीका ललीता चव्हाण या देखील कार्यक्रमासाठी जात होत्या. अंदाजे 12 वाजण्याच्या सुमारास दरम्यान पांढरी येथील वळणावर परतवाडा येथून अंजनगांव सुर्जीकडे येणाऱ्या ट्रकने समोरुन दिली. अपघातावेळी ट्रक इतक्या वेगात होता की चारचाकी वाहनास सुमारे पन्नास फूट फरफटत नेले. यात ललिता चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रमोद निपाणे यांना अमरावती येथे नेत असताना त्यांचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.

अपघातावेळी मुसळधार पाऊस

हा अपघात झाला तेव्हा पांढरीसह संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. अंजनगांव सुर्जी येथील पोलीस प्रशासनाने महामार्गाच्या क्रेनने ट्रकमध्ये फसलेले वाहन कढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

15 दिवसांत दुसरी घटना

अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने एकाच ठिकाणी दुसरा अपघात होऊन आतापर्यंत चार जणांचा मृत्यू या ठिकाणी झाला आहे. एवढा मोठा महामार्ग बांधत असतांना रस्त्यावरील अपघातासाठी कारण ठरणारे वळण महामार्ग प्रशासनाने काढू नये. ही फार मोठी शोकांतिका असून संबंधित प्रशासन अजून किती अपघाताची वाट पहात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे अंजनगाव सुर्जी शहरावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - अमरावतीत पावसामुळे मातीच्या मूर्त्यांना फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.