अमरावती - धारणीपासुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ सोमवारी सायंकाळी धारणी पोलिसांनी दोन युवकांकडून चार देशी कट्टे आणि दोन जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशातुन धारणीत देशी कट्ट्यांची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
हेही वाचा - जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवा... यशोमती ठाकुरांनी पोलिसांना भरला दम
याबाबतची सविस्तर माहिती अशी, की धारणी शहरात मागील 2 वर्षांपासुन मध्यप्रदेशातील पाचोरी गावातून लखबीर अकालसिंह खिंची उर्फ लकी (वय 19) आणि संजयसिंग जसपाल पटवा (वय 21) हे दोघे चाव्या बनविण्याचे काम करण्यासाठी धारणीत येत होते. चाव्या बनविण्याच्या कामाच्या आड हे दोघेही देशी कट्ट्यांची तस्करी करत होते. सोमवारी या दोघांनी तालुक्यातील एका व्यक्तीसोबत चार देशी कट्टे विकण्याचा सौदा केला होता. त्याप्रमाणे ते दोघे बऱ्हाणपूर, खण्डवा, इंदौर या राज्य महामार्गावर असलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ एका दुचाकीने चार देशी कट्टे आणि दोन जीवंत काडतुसे घेऊनउभे होते.
हेही वाचा - गजाची झलक, सबसे अलग..! तब्बल टनभर वजनाचा बैल ठरतोय अमरावतीतील प्रदर्शनाचे आकर्षण
यासंदर्भात धारणी पोलिसांना गुप्त हेराकडूंन मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक तांबे कान्होपात्रा, भारत लसंते, अरविंद सरोदे, रविंद्र वऱ्हाडे, प्रभाकर डोंगरे यांनी साफळा रचुन या दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चार देशी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्या दोघा विरुद्ध पोलीस निरीक्षक भारत लसन्ते यानी फिर्याद नोंदविली असून दोघांविरोधात भादंवि कलम 3/25 आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी संजय काळे, पोलीस निरीक्षक एल. के. मोहंदुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.