ETV Bharat / state

अमरावतीत ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श, ट्रक जळून खाक

भर उन्हात स्पर्श झाल्याने टिप्परने थेट पेट घेतला. ट्रक चालकाने आपला जीव वाचवला. मात्र, ट्रक काही मिनीटांतच जळून खाक झाला.

विजेच्या तारांच्या स्पर्शामुळे जळालेला ट्रक
author img

By

Published : May 4, 2019, 8:32 PM IST

अमरावती - समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परला विजेच्या तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे टिप्पर जागीच जळून खाक झाला आहे. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारासा चांदूर रेल्वे तालुक्यात ही घटना घडली.

विजेच्या तारांच्या स्पर्शामुळे जळालेला ट्रक

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड परिसरात समृध्दी महामार्गाचे काम दिवस रात्र सुरू आहे. घुईखेड येथील शेतशिवारातून गौणखनिज खोदून मांजरखेड येथे ट्रकने नेले जात आहे. आज दुपारी गौणखनिज खाली करून परत येत असताना अचानक एलएनकेव्हीच्या वरील विजेच्या तारांना टिप्परचा स्पर्श झाला. भर उन्हात स्पर्श झाल्याने टिप्परने थेट पेट घेतला. ट्रक चालकाने आपला जीव वाचवला. मात्र, ट्रक काही मिनीटांतच जळून खाक झाला. हा ट्रक एनसीसी कंस्ट्रक्शनचा असून राजस्थान राज्यातील आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

Intro:समृध्दी महामार्गाच्या टिप्पर ला चालु इलेक्ट्रीक ताराचा स्पर्श
ट्रक जळुन खाक

मांजरखेड (दानापुर) शेतशिवारातील घटना

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात सुरू असलेल्या समृध्दी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परला चालु इलेक्ट्रीक तारांचा स्पर्श झाल्याने टिप्पर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड परिसरात समृध्दी महामार्गाचे काम दिवस रात्र सुरू आहे. अशातच घुईखेड शेतशिवारातुन गौणखनिज खोदून मांजरखेड (दानापुर) शेतशिवारातुन ट्रकने ने - आन करण्याचे काम सुरू आहे. अशातच शनिवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान टाटा मोटर्स कंपनीचे एलटीडी / एलपीके २५१८ या नावाचा टिप्पर क्र. आरजे १९ जीडी १४७० मुरूम खाली करून परत येत असतांना अचानक एलएनकेव्ही च्या वरील चालु तारांना टिप्परचा स्पर्श झाला. भर उन्हात स्पर्श झाल्याने टिप्परने थेट पेट घेतला. ट्रक चालक याने कसा - बसा आपला जीव वाचविला. यामध्ये ट्रक काही मिनीटामध्येच जळुन खाक झाला. सदर ट्रक एनसीसी कंस्ट्रक्शनचा असुन राजस्थान राज्यातील आहे. सदर माहिती मिळताच गावकऱ्यांनी या ठिकाणी एकच गर्दी केली होती.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.