ETV Bharat / state

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन, १५ शाळेतील २०० विद्यार्थ्यांचा सहभाग - sant gadge baba death anniversary

अमरावती येथील लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशनच्या वतीने अमरावती, भातकुली व दर्यापूर या तालुक्यातील १५ वेगवेगळ्या गावातल्या १५ शाळेमधील २०० विद्यार्थ्यांच्या सहाय्याने कर्मयोगी श्री. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमीत्त त्यांच्या कार्यांना उजाळा देत पथनाट्य सादर करून आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले. तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.

amt
संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमीत्ताने जनजागृतीपर कार्यक्रम सादर करताना विद्यार्थी
author img

By

Published : Dec 25, 2019, 12:50 PM IST

अमरावती - गावोगावी भजन-कीर्तन करून आपल्या झाडूने स्वतः गाव स्वच्छ करून स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने अमरावती येथील लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशनच्या वतीने अमरावती, भातकुली व दर्यापूर या तालुक्यातील १५ वेगवेगळ्या गावातल्या १५ शाळेमधील २०० विद्यार्थ्यांच्या सहाय्याने कर्मयोगी श्री. संत गाडगेबाबांच्या कार्यांना उजाळा देत पथनाट्य सादर करून आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले. तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.

संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमीत्ताने जनजागृतीपर कार्यक्रम सादर करताना विद्यार्थी

'लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन' गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक श्रेत्रात जनजागृती तसेच विविध शिबिराच्या माध्यमातून कार्य करत आहे. हे असोसिएशन कायदे, आरोग्य, शैक्षणिक या महत्वाच्या विषयांवर जनजागृती करत आलेली आहे. याच कार्याला पुढे नेत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्याच शैलीमधे जनजागृती करण्याचा संकल्प पुर्ण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी लिगल स्क्वेअर तर्फे तिन्ही तालुक्यातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांना आधी पथनाट्य संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर सर्व ठिकाणी एकाच वेळी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

हेही वाचा - अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे सात विद्यार्थी झाले न्यायाधीश

पथनाट्याचे विषय हे व्यसनमुक्ती, स्वच्छता, रस्ता-सुरक्षा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनवर आधारित होते. अगदी चिमुकल्या ५ व्या वर्गातील विद्यार्थ्यांनीसुद्धा या उपक्रमात भरभरून सहभाग घेत आपल्या गावामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्या; 1500 विद्यार्थ्यांनी लिहिले तीन हजार फुटांचे पत्र

Intro:१५ गावामध्ये २०० विद्यार्थांच्या सहाय्याने गाडगे बाबा यांना अनोखे अभिवादन. 

लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन अमरावती चा उपक्रम.
----------------------------------------------
 अमरावती अँकर

गावोगावी भजने कीर्तन करून ,आणि आपल्या झाडूने स्वतःहा गाव स्वच्छ करून स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने अमरावती येथील लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन च्या वतीने अमरावती, भातकुली व दर्यापूर या तालुक्यातील १५ वेगवेगळ्या गावामध्ये २०० विद्यार्थ्यांच्या सहाय्याने कर्मयोगी श्री. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या कार्यांना उजाळा देत पथनाट्य करून एक आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले.तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन मागील अनेक वर्षांपासून सामाजिक श्रेत्रात जनजागृती तसेच विविध शिबिराच्या माध्यमातून समाजामध्ये कायद्या, आरोग्य, शैक्षणिक या महत्वाच्या विषयांवर जनजागृती करत आलेली आहे. याच कार्याला पुढे नेत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्याच शैली मधे जनजागृती करण्याचा संकल्प पुर्ण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या साठी लिगल स्क्वेअर तर्फे तिन्ही तालुक्यातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांना अगोदर पथनाट्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. सर्व ठिकाणी एकाच वेळी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. पथनाट्याचा विषय हा व्यसनमुक्ती, स्वच्छता, रस्ता-सुरक्षा तसेच अंधश्रद्धा निर्मूलन हे असुन अगदी चिमुकल्या ५ व्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या छोट्याशा आवाजामधे यामध्ये आपल्या गावामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.