ETV Bharat / state

शेतशिवारात आदिवासी महिलेची हत्या; आरोपीला अटक

Amravati Murder News : परतवाडा ते धारणी मार्गावर असणाऱ्या शेतशिवारात आदिवासी महिलेची हत्या (Tribal Women Murder) झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुन्ना जामुनकरला (वय36) अटक केली आहे.

Amravati Crime News
आदिवासी महिलेची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 10:03 PM IST

अमरावती Amravati Murder News : अमरावती जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. परतवाडा पोलीस ठाण्याच्या (Paratwada Police Station) हद्दीत परतवाडा ते धारणी मार्गावर असणाऱ्या शेतशिवारात आदिवासी महिलेची हत्या (Tribal Women Murder) झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

शेतातील पलंगावर पडला होता मृतदेह : रविवारी सकाळी शेतमालक जाधव हे शेतात आले असताना त्यांना एका महिलेचा मृतदेह शेतातील पलंगावर आढळून आला. याबाबत जाधव याची तत्काळ परतवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृत महिलेच्या पायावर जखमा आढळून आल्या. तसेच पलंगाजवळ तिच्या हातातील काचेच्या बांगड्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

शेतातील रखवालदाराकडे नियमित यायची मृत महिला : जाधव यांच्या शेतात मुन्ना जामुनकर हा गत दीड दोन वर्षांपासून रखलदार म्हणून कामाला होता. त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. दरम्यान मुन्ना जामुनकरला भेटायला महिला नेहमीच शेतात यायची. अनेक वेळा ही महिला या शेतात मुक्कामी देखील राहायची. दोन दिवसापूर्वी ही महिला शेतात मुन्नाच्या झोपडीत आली होती. या ठिकाणी मुन्ना जामुनकर आणि मृत माहिला यांनी दारू पिऊन मांसाहारी भोजन केल्याची माहिती, ठाणेदार संदीप चव्हाण यांनी दिली. मुन्ना जामुनकर आणि माहिला यांच्यात कुठल्यातरी कारणाने वाद झाल्यावर तिची मुन्नाने हत्या केली असावी असा अंदाज, पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात मुन्ना जामुनकरला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. शरद मोहोळ हत्या प्रकरण : 'मी' मामासाठी हत्या करणार, आरोपीचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर
  2. पतीची हत्या करून मृतदेह लपविल्याच्या प्रकरणात चौघांना अटक, सहा महिन्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण
  3. शरद मोहोळ हत्या प्रकरण : पोलिसांनी 8 आरोपींना 'फिल्मी स्टाईल' केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.