ETV Bharat / state

Chikhaldara Temperature Increased : चिखलदऱ्यात पहिल्यांदाच उन्हाचा पार 40 डिग्री पार; उन्हामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ - चिखलदरा तापमान वाढ

विदर्भातील थंड हवेचे ठिकाण अशी ओळख ( Chikhaldara Tourist Place ) असणाऱ्या चिखलदरा या पर्यटन स्थळाला या वर्षी पाहित्यांदाच उन्हाचा जबर ( High Temperature In Chikhaldara ) फटका बसला आहे. चिखलदऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 40 डिग्रीच्या पार गेले आहे.

Chikhaldara High Temperature
Chikhaldara High Temperature
author img

By

Published : May 16, 2022, 6:35 PM IST

अमरावती - विदर्भातील थंड हवेचे ठिकाण अशी ओळख ( Chikhaldara Tourist Place ) असणाऱ्या चिखलदरा या पर्यटन स्थळाला या वर्षी पाहित्यांदाच उन्हाचा जबर ( High Temperature In Chikhaldara ) फटका बसला आहे. चिखलदऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 40 डिग्रीच्या पार गेले आहे.

रस्त्यावर शुकशुकाट - चिखलदरा येथील भिमकुंड, पंचबोल पॉईंट, गावीलगड किल्ला, वन उद्यान या भागात पर्यटन स्थळांवर नेहमीच गर्दी असते. या वर्षी मात्र या भागात शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. पर्यटकांनी उन्हामुळे पाठ फिरवल्याने चिखलदरा येथील हॉटेल व्यवसाय ठप्प पडला आहे. उन्हाळ्यात 30 ते 35 डिग्री तापमान असणाऱ्याना चिखलदऱ्यात पहित्यांदा उन्हाचे चटके बसत आहे.

पाणी पुरवठा नाही - चिखलदरा शहराला पाणी पुरवठा ( Water Shortage In Chikhaldara ) करणारा शक्कर तलाव आटाला आहे. त्यामुळे शहरात तीन दिवस आड पाणी पुरवठा होतो आहे. परतवाडा शहरातून टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. चिखलदरा येथील प्रत्येक हॉटेलमध्ये टँकरद्वारे पाणी आणले जात आहे. विशेष म्हणजे पर्यटक नसल्यामुळे एक टॅंकर पाणी आठ दिवस पुरत असल्याचे हॉटेल व्यवसायिक सांगतात. जंगलातील पाणवट्यांवरही टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जंगलात वाघ, बिबट, अस्वल, हरीण, निलंगाय असे प्राणी आहेत. जंगलातीत नैसर्गिक पाणवठे आटले असून वन्य प्रामांसाठी या पाणवट्यातही टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर बैलुमे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Ketki Chitale Post Controversy : केतकी चितळेला घेऊन ठाणे गुन्हे शाखा नवी मुंबईला रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.