अमरावती - दिवाळीनंतर आता मेळघाटमध्ये जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला काही पर्यटकांना मेळघाटमधील धारगड बोरी जंगलात जंगल सफारी दरम्यान गुल्लरघाट परिसरात एकाचवेळी चार वाघांची साईड राईटिंग अनुभवायला मिळाली. एकाच ठिकाणी चार वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटकांची चांगलीच धडकी भरली होती. यातील काही वाघांचे दृश्य मोबाइल कॅमेऱयात पर्यटकांनी टिपले.
जंगल सफारीला प्राधान्य
आता दिवाळीनंतर हळूहळू मेळघाटमध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मेळघाटच्या विस्तीर्ण अशा जंगलाची पाहणी करण्यासाठी पर्यटक जंगल सफरीला प्राधान्य देत असतात. अशाच प्रकारे पाडव्याच्या दिवशी काही पर्यटक हे जिप्सीने मेळघाटात धारगड बोरी जंगलात जंगल सफारी करत असताना त्यांना गुल्लर घाटमध्ये पोहचताच रानगव्यांचा ग्रुप चराई करत असताना दिसला. मात्र, तेथून थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांना चार वाघांची साईड राईटिंगचा थरार या पर्यटकांना अनुभवायला मिळाला.
शेकडो प्रजातींचे प्राणी
मेळघाटच्या जंगलात शेकडो विविध प्रजातींचे प्राणी आहेत. परंतु, नेहमी या जंगलात पर्यटकांची वर्दळ असते. यामुळे हे प्राणी मुक्तसंचार करताना क्वचितच पाहायला मिळतात. पण, सध्या कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी आहे. त्यामुळे वन्यजीवमुक्त संचार करत आहेत.
महाराष्ट्रातील हा पहिलाच व्याघ्र प्रकल्प
२२ फेब्रुवारी १९७४ साली भारतात एकूण ९ अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. यात मेळघाटचा समावेश होता. मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणातील वाघ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. या व्याघ्र प्रकल्पात एकूण 35 वाघांचा संचार आहे. ६ व ७ मे रोजी मेळघाटमध्ये प्राण्यांची गणना करण्यात आली. त्यानुसार, मेळघाटात १७ हजार १८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यात ३५ वाघांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ४० बिबटे, ३४० अस्वल, १७२ रानकुत्रे, तर ७५२ गवे आढळून आले आहेत.
हेही वाचा - ''मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन'' : महेश टिळेकरांची अमृता फडणवीसांच्या गायनावर जोरदार टीका
हेही वाचा - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आठवा स्मृतिदिन