अमरावती - विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटालाही कोरोनाचा जबर फटका बसला आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता वनविभागानेसुद्धा मेळघाटातील पर्यटन ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात मेळघाटात पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडवल्याने याचा फटका येथील व्यवसायाला बसला आहे.
कोरोना विषाणू भारतात दाखल झाल्यानंतर त्याने आपले पायमूळं राज्यातही पसरले असून बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील खासगी, शासकीय महाविद्यालय, शाळा, चित्रपटगृह, मॉल, सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, या विषाणूचा धसका वनविभागाने घेतला असून मेळघाटातील सर्व विश्रामगृह, पर्यटनस्थळे, उंट सफारी, हत्ती सफारी यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मेळघाटसह चिखलदऱयामध्येही आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
अमरावती - फासेपारधी समाजाचा समृद्धी महामार्गावर विविध मागण्यांसाठी ठिय्या
चिखलदरा हे थंड हवेच ठिकाण असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर याठिकाणी गर्दी करत असतात. मात्र, कोरोनाच्या प्रभावामुळे मागील एका आठवड्यापासून याठिकाणी पर्यटकांची रेलचेल कमी झाली आहे. याठिकाणी मोजकेच पर्यटक येत असल्याने याचा फटका येथील व्यापार आणि गाईड्सवरही पडत आहे. ज्यांची उपजीविका या पर्यटकांवर असते त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
अमरावती - कोरोनाबाबत अफवा पसरवली तर खबरदार... पोलीस आयुक्तांचा इशारा