ETV Bharat / state

Ravi Rana Birthday : वाढदिवसानिमित्त राणांच्या घरासमोर दिव्यांची आरास; तर उद्या वृद्धांना कपडे वाटप - रवी राणांचा वाढदिवस

अमरावती येथील शंकरनगर स्थित निवासस्थानासमोर बुधवारी रात्री अकराशे दिव्यांची आरास सजवण्यात आली तसेच सुंदर कांडचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रवी राणा यांचा बुधवारी वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपला नेता कारागृहात असतानाही आगळा-वेगळा असा संदेश देण्याच्या उद्देशाने हे संपूर्ण आयोजन करण्यात आले आहे.

दिव्यांची आरास
दिव्यांची आरास
author img

By

Published : Apr 28, 2022, 10:46 AM IST

Updated : Apr 28, 2022, 1:26 PM IST

अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा सध्या तुरुंगवासात आहेत. अमरावतीतील शंकरनगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी रात्री अकराशे दिव्यांनी रोशनाई करण्यात आली. तसेच 'सुंदर कांड'चे आयोजन करण्यात आले. आमदार रवी राणा यांचा बुधवारी वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपला नेता कारागृहात असतानाही आगळा-वेगळा असा संदेश देण्याच्या उद्देशाने हे संपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. रवी राणा यांची मुलगी नंदिनी आणि मुलगा राजवीर यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त घरासमोर दिव्यांची आरास लावण्यात कार्यकर्त्यांना मदत केली आहे.

वाढदिवसानिमित्त राणांच्या घरासमोर दिव्यांची आरास

राणा दाम्पत्य कारागृहात - राणा यांच्या अमरावतीच्या घरासमोर मंगळवारी रात्री आनंददायी वातावरण असताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही सध्या कारागृहात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री या निवासस्थानी दत्त शनिवारी हनुमान चालीसा पठणासाठी मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर केले असता राजद्रोहाच्या गुन्ह्यांमध्ये दोघांनाही 14 दिवसांचा तुरुंगवास सुनावण्यात आला.

  • Maharashtra | Aarohi Rana, 8-year-old daughter of Amravati MP Navneet Rana and MLA Ravi Rana, recited Hanuman Chalisa at her residence in Amravati yesterday, April 27, for the release of her parents from jail

    "I pray to God that my parents are released soon," she said pic.twitter.com/Fu3rMCwpO9

    — ANI (@ANI) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमरावतीत राणा समर्थकांचे रोजच आंदोलन - आमदार रवी राणा यांचा बुधवारी वाढदिवस असल्यामुळे आज त्यांच्या घरासमोर दिव्यांची आरास लावून सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले. राणा समर्थकांकडून राणा दाम्पत्य कारागृहात असताना शासनाचे लक्ष वेधण्यातकरिता तीन दिवसांपासून विविध स्वरूपाचे आंदोलन केले जात आहे. आजही वाढदिवसानिमित्त घरासमोर लावलेली दिव्यांची आरास आणि सुंदर्कांड चे आयोजन हा आंदोलनाचाच एक भाग असल्याचे युवा स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

रवी राणा यांच्या मुलांनी मदत केली
रवी राणा यांच्या मुलांनी मदत केली

अकराशे वृद्धांना कपडे वाटप - आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त बडनेरा मतदारसंघातील अकराशे वृद्ध व्यक्तींना कपड्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी दिली. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा हे कारागृहात असले तरी आमदार राणा आपला वाढदिवस ज्याप्रमाणे जनसेवा दिवस म्हणून साजरा करतात, अगदी तसाच जनसेवा दिवस म्हणून आम्ही आमदार रवी राणा यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत, असेही जितु दुधाने यांनी स्पष्ट केले.

निवासस्थान

Last Updated : Apr 28, 2022, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.