ETV Bharat / state

Graduate Constituency Election : पदवीधर-शिक्षक आमदार निवडीसाठी मतदारांची गर्दी, अमरावती विभागात 262 मतदान केंद्र

author img

By

Published : Jan 30, 2023, 12:12 PM IST

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. अमरावती विभागातील अमरावती अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यात एकूण 262 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदानाला अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत आहे. आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा...

Graduate Constituency Election
अमरावती विभागात मतदानाला सुरुवात
अमरावती विभागात मतदानाला सुरुवात

अमरावती : विभागात 262 मतदान केंद्र असून त्यापैकी अमरावती जिल्ह्यात 75, अकोला जिल्ह्यात 61, बुलढाणा जिल्ह्यात बाबत वाशिम जिल्ह्यात 26 आणि यवतमाळ जिल्ह्यात 48 केंद्र आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून 288 मतदान अधिकारी, 1153 निरीक्षक, 289 अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

अशी आहे मतदारांची संख्या : अमरावती विभागात एक लाख 34 हजार 14 पुरुष, तर 72 हजार 141 महिला आणि इतर 17 असे एकूण 2 लाख 6 हजार 172 मतदार आहेत. अकोला जिल्ह्यात 31 हजार 769 पुरुष 1831 महिला आणि सहा हजार इतर असे एकूण 50 हजार 606 तसेच बुलढाणा जिल्ह्यात 27,168 पुरुष 10724 महिला असे एकूण 37 हजार 894 मतदार आहेत. वाशिम जिल्ह्यात 13,33 पुरुष 4715 महिला आणि इतर दोन असे एकूण 18050 मतदार आणि यवतमाळ जिल्ह्यात 23 हजार 785 पुरुष 11493 महिला असे 35 हजार 278 मतदार आहेत.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त : निवडणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विभागातील सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकूण 1 हजार 410 पोलीस या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले आहे.

दुपारी वाढणार मतदारांची गर्दी : सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची विशेष अशी गर्दी दिसली नाही. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे चित्र आहे. दुपारी 12 नंतर मात्र मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होणे अपेक्षित आहे.

2 तारखेला मतमोजणी : राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तर येत्या 2 तारखेला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे या पाचही निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमरावतीत 23 उमेदवार रिंगणात : अमरावती पदवीधर मतदारसंघात एका जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती पदवीधरसाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातून मतदान होणार आहे.

हेही वाचा : Graduate Constituency Election पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कसे नोंदवावे आपले मत तज्ज्ञांनी दिला विशेष सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.