अमरावती - शहरातील इर्विन चौक येथे सीएए आणि एनआरसीविरोधात २ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मुस्लीम बांधवांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यामुळे दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे. शहरातील सर्व महत्त्वाच्या मशिदींसह इर्विन चौक येथे पोलीस मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मुस्लीम बांधवांचे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मात्र, दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. तसेच शहरातील सर्व महत्त्वाच्या मशिदींच्या परिसरातही मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच इर्विन चौकात राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
काय आहे दिल्ली हिंसाचार प्रकरण? -
सीएए समर्थक आणि विरोधकांचे दोन गट २३ फेब्रुवारीला आमनेसामने आले होते. यावेळी जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारामध्ये मृतांचा आकडा वाढून ३८ झाला आहे. पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.