ETV Bharat / state

Tiger Attack On Youth : बांबू तोडण्यासाठी मेळघाटातील जंगलात गेलेल्या तरुणावर वाघाचा हल्‍ला, एकाला दरीत नेले ओढून - वनविभाग

मेळघाटात बांबू तोडण्यासाठी गेलेल्या तीन तरुणावर वाघाने हल्ला केला. यातील दोन जण झाडावर चढल्याने बचावले गेले. मात्र एका तरुणाला वाघाने खोल दरीत ओढत नेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tiger Attack On Youth
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 12, 2023, 10:10 PM IST

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागातील माताकोल संरक्षण कॅम्‍प नजीक कारा येथील एका युवकावर वाघाने हल्ला केल्‍याची घटना सोमवारी दुपारी घडली. या युवकाला वाघाने फरफटत दरीत ओढून नेले असून घटनास्थळी त्याचा मोबाईल, पॅन्‍ट आढळून आले असून घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला आहे. त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. राजेश रतिराम कास्देकर (28, रा. कारा) असे या युवकाचे नाव आहे.

बांबू तोडण्यासाठी गेला होता जंगलात : निस्ताराचे बांबू तोडण्यासाठी कारा येथील भुरेलाल कासदेकर, सुखलाल धांडे आणि राजेश कासदेकर हे तीन मजूर माताकोल संरक्षण कॅम्‍प परिसरात गेले होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर वाघाने हल्ला चढविला व राजेशला दरीत ओढून नेले. भुरेलाल कास्देकर, सुखलाल धांडे हे घाबरून एका झाडावर चढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळी रक्ताचा सडा साचला होता. वाघाने राजेशला खोल दरीत ओढत नेल्याने त्‍याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभाग घेत आहे शोध : या गंभीर घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पाचे पथक माताकोल संरक्षण कॅम्प परिसरात दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने राजेश कासदेकर याला खोल दरीत शोधण्याचा प्रयत्न केला. राजेशला घेऊन गेलेल्या वाघाचा शोध देखील युद्ध स्तरावर करण्यात येत आहे. सायंकाळपर्यंत राजेशचा कुठलाही पत्ता लागला नव्हता, तसेच राजेशला ओढून नेणारा वाघ देखील नेमका कुठे गेला हे कळले नव्हते. या वाघाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

दोन जण बचावले, एक जण ठार झाल्याची शक्यता : मेळघाटातील जंगलात बांबू तोडण्यासाठी गेलेल्या तीन जणांवर वाघाने हल्ला केला. यावेळी दोन जण झाडावर चढण्यात यशस्वी झाल्याने बचावले आहेत. तर एका तरुणाला वाघाने ओढत जंगलात नेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीत आहेत.

हेही वाचा -

  1. Tiger Attack On Farmer : वाघाच्या हल्ल्यात अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू
  2. Tiger Attack in Sitabani Zone : जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांनी वाघिणीला डिवचले, पहा पुढे काय झाले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.