अमरावती : अपघातात दोन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रफुल्ल गावंडे ( वय २७, रा. बुलढाणा), प्रणीत राऊत ( वय २५, रा. बुलढाणा) व सचिन गुडधे ( वय ३१, लासूर, दर्यापुर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते. मिळालेल्या माहीतीनुसार अमरावती येथे आयोजित एका लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रफुल्ल गावंडे व प्रणीत राऊत गुरुवारी दुपारी बुलढाणा येथून कार (क्र. एम.एच. १२/जी.एन. ४०२८) ने दर्यापुर येथे येत होते.
दुचाकी कारवर आदळली : यावेळी सचिन गुडधे दुचाकी (क्र. एम.एच.२७/ डी.बी.१११६) ने लासूर येथे जात होता. परंतु चारचाकी वाहन रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या लोखंडी खांबावर आदळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे याच मार्गाने जाणाऱ्या सचिन गुडधे याची दुचाकी कारवर आदळली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे. अपघातामध्ये शिवम नागपुरे व पवन तायडे असे दोन युवक जखमी झाले आहे.
प्रकरणाचा तपास : जखमींवर दर्यापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहीती मिळताच दर्यापुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रूग्णालयात हलविण्यात आले, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाचा तपास दर्यापुर पोलीस करीत आहेत. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृतकांसह जखमींच्या नातेवाईकांनी गर्दी केली. हा अपघात दर्यापूर येथील गाडगेबाबा सूतगिरणीजवळ अपघात झाला.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात : 7 एप्रिल रोजी भिवंडीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात झाले. या अपघातात चार जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. भिवंडीतील पोगाव परिसरात पहिल्या घटनेत पाण्याच्या टँकरने कारला धडक दिली होती. यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या घटनेत शिरसाड मार्गावरील कोपरोली जवळ जगदंब ढाब्यासमोर कार व मोटर सायकलची धडक झाली होती. या अपघातात पित्यासह त्याच्या तीन वर्षाच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोनजण गंभीर जखमी झाले होते.