अमरावती - महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी गुफेत विराजमान झालेल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सालबर्डी देवस्थान मध्ये महाशिवरात्रीला हजारो भाविकांची गर्दी असते.पहिल्या पायरी पासून ते चार किलोमीटर दूर पहाडावर वसलेले हे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळ पासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली आहे.
हजारो वर्षां पूर्वी शंकरजीनी येथे तपचर्या केल्याची आख्यायिका आहे. येथेच पार्वतीही शंकरजीच्या शोधात सालबर्डी येथे आल्याचे बोलले जाते. सातपुडा पर्वत रांगेत निसर्ग रम्य आणि वरून पहाडातून पाणी झिरपणाऱ्या पहाडाखाली भोले शंकराची पिंड विराजमान आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे येऊन पुजा अर्चना करतात. मध्यप्रदेश मधील होशगाबादमध्ये असलेल्या पचमढित असलेल्या महादेवाला मोठा महादेव म्हणून ओळखले जाते. तेथे जे भाविक जातात ते आधी या ठिकाणी पाहिल्या पायरीचे दर्शन घेऊन पुढील यात्रेला रवाना होतात. म्हणून याला लहान महादेव म्हणून ओळख आहे. सध्या महाशिवरात्री निमित्ताने देशभरातील महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी ही पाहायला मिळते त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या या ठिकाणी मोठी गर्दी पहायला मिळते.