ETV Bharat / state

बालाजी नगर परिसरात चोरट्यांनी फोडले घर; १५ दिवसात दुसरी घटना

author img

By

Published : Dec 22, 2019, 6:50 PM IST

Updated : Dec 22, 2019, 7:36 PM IST

आज सकाळी शेजाऱ्यांना कोराट यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरी झाल्याच्या संशयावरून शेजाऱ्यांनी संजीवनी कोराट यांच्याशी संपर्क साधला. चोरी झाल्याची माहिती मिळताच संजीवनी आजच पुण्यावरून बदनेरला पोहोचल्या. घरी परत येताच संजीवनी कोराट यांनी राजपेठ पोलीस स्टेशनला चोरीच्या घटनेबाबत तक्रार दिली.

amravati
बालाजी नगर परिसरात चोरट्यांनी फोडले घर

अमरावती- घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बालाजी नगर परिसरात घर फोडले. चोरट्यांनी घरातील टीव्हीसह अनेक वस्तू चोरल्या. परिसरात १५ दिवसाच्या आत घरफोडीची ही दुसरी घटना आहे.

बालाजी नगर परिसरात चोरट्यांनी फोडले घर

राजपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बालाजीनगर येथील रहिवाशी संजीवनी कोराट या गत शनिवारी मुलाला आणि सुनेला भेटाण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या. आठ दिवसांपासून घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी शनिवारी रात्री कोराट यांच्या फाटकाचे आणि दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ४९ इंच टीव्ही तसेच कपडे आणि काही वस्तू चोरून नेल्या.

आज सकाळी शेजाऱ्यांना कोराट यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरी झाल्याच्या संशयावरून शेजाऱ्यांनी संजीवनी कोराट यांच्याशी संपर्क साधला. चोरी झाल्याची माहिती मिळताच संजीवनी आजच पुण्यावरून बदनेरला पोहोचल्या. घरी परत येताच संजीवनी कोराट यांनी राजपेठ पोलीस स्टेशनला चोरीच्या घटनेबाबत तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दरम्यान, बालाजी नगर परिसरात कोराटे यांचे शेजारी बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांचे देखील घर फोडले होते. १५ दिवसात घरफोडीच्या दोन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा- एल्गार परिषदेच्या प्रकरणाची 'एसआयटी' तर्फे चौकशी व्हावी; शरद पवारांची मागणी

Intro:घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने बालाजी नगर परिसरात घर फोडले. घरातील टीव्हीसह अनेक वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या. पंधरा दिवसात या परिसरात घरफोडीची ही दुसरी घटना आहे.

Body:राजपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बालाजी नगर येथील रहिवासी संजीविनी कोराट या गत शनिवारी मुलाला आणि सुनेला भेटायसाठी पुण्याला गेल्या होत्या. आठ दिवसांपासून घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी शनिवारी रात्री कोराट यांच्या फटकाचे आणि दराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील 49 इंच टीव्ही तसेच कपडे आणि काही वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या. आज सकाळी शेजारऱ्यांना कोराट यांच्या घराचे कुलूप तुटले दिसल्यावर त्यांना चोरी झाल्याचा संशय येताच त्यांनी संजीवनी कोराट यांच्याशी संपर्क साधला असता त्या आजच पुण्यावरून बदनेरला पोचल्या होत्या. घरी परत येतच संजीविनी कोराट यांनी राजपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बालाजी नगर परिसरात कोराट यांच्या घराशेजारी राहणारे मंडवागडे हे सुद्धा बाहेरगावी गेले असता त्यांचे घर फोडले होते. परिसरात 15 दिवसात घरफोडीच्या दोन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 22, 2019, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.