ETV Bharat / city

Amravati District MLA Included Cabinet: अमरावती जिल्ह्यातून 'या' तीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता - Cabinet Expansion Of Shinde Government

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या नव्या सरकारचा विस्तार लवकरच होणार आहे. ( Cabinet Expansion Maharashtra ) या नव्या सरकारमध्ये अमरावती जिल्ह्यातून माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू, बडनेराचे आमदार रवी राणा आणि जिल्ह्यात धामणगाव रेल्वे मतदार संघात भाजपचे एकमेव आमदार असणारे प्रताप अडसड या तिघांची नावे जिल्ह्यातून मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

अमरावती जिल्ह्यातून 'या' तीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता

author img

By

Published : Aug 5, 2022, 3:54 PM IST

Updated : Aug 9, 2022, 7:53 AM IST

अमरावती - महाराष्ट्रात सत्तेवर असणाऱ्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये अचलपूर मतदार संघात प्रहार पक्षाचे संस्थापक असणारे आमदार बच्चू कडू सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असणारे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. ( Cabinet Expansion Of Shinde Government ) बच्चू कडू यांच्यासोबतच त्यांच्या प्रहार पक्षाचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे देखील होते. सलग चारवेळा अचलपूर विधानसभा मतदार संघाचे बच्चू कडू प्रतिनिधित्व करत असून आपल्या आगळ्या-वेगळ्या रांगड्या शैलीने बच्चू कडू हे संपूर्ण राज्यात ओळखले जातात. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळात बच्चू कडू यांनाही मंत्रीपद मिळेल अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

उद्धव ठाकरें विरोधात सातत्याने आंदोलन करणाऱ्या रवी राणांच्या नावाची चर्चा - उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने आंदोलन करणारे बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना हमखास मंत्रीपद मिळणार असल्याचे त्यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत. विशेष म्हणजे आमदार रवी राणा यांनी पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यासह हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात छेडलेल्या आंदोलनामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या आंदोलनामुळे राणा दाम्पत्याने संपूर्ण देशाचे लक्ष स्वतःकडे वेधले होते. राणा दांपत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने केलेल्या आंदोलनामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

रवी राणा यांना निश्चितपणे स्थान मिळेल - 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवी राणा यांची वर्णी लागणार अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. त्यावेळी मात्र भाजपला डावलून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यामुळे आमदार रवी राणा यांची संधी हुकली असेही सांगण्यात येत होते. आता मात्र शिंदे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आमदार रवी राणा यांना निश्चितपणे स्थान मिळेल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त केला जातो आहे.

भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी प्रताप अडसडांच्या नावाचाही विचार - 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदार संघापैकी अमरावती मोर्शी दर्यापूर आणि मेळघाट या चार मतदारसंघात भाजपचे आमदार होते. 2019 च्या निवडणुकीत मात्र केवळ चांदुर रेल्वे मतदार संघात भाजपचे प्रताप अडसड हे एकमेव भाजपचे आमदार निवडून आले आहेत . युवा असणारे प्रताप अडसड यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी त्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता सुद्धा आहे.

हेही वाचा - congress agitation : महागाईच्या विरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू

Last Updated : Aug 9, 2022, 7:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.