ETV Bharat / state

मेळघाटातील वाघ आणि आदिवासींंमध्ये 'कुला-मामाचे' नाते

वाघांच्या अधिवासासाठी तयार केलेल्या पूरक गोष्टींमुळेच वाघ आणि आदिवासी यांच्यात होणारा संघर्ष टळल्याचा दावा वन्य जीव अभ्यासक यादव तरटे यांनी केला आहे.

there-is-a-good-relationship-between-tigers-and-tribals-in-melghat-said-yadav-tarte
मेळघाटातील वाघ आणि आदिवासींंमध्ये 'कुला मामाच' नाते
author img

By

Published : Nov 3, 2020, 7:54 PM IST

अमरावती - वाघ आणि मनुष्य यातील संघर्षाच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. अगदी चंद्रपूरमध्ये या घटना नेहमी घडत असतात; परंतु महाराष्ट्रातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प व भारतातील एकूण ९ अभयारण्यांना पैकी एक असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चित्र मात्र आशादायक आहे. वाघ आणि आदिवासी यांच्यातील इथले नात जगावेगळे आहे. येथे वाघाला आदिवासी बांधव हे 'कुला मामा' म्हणजेच आईचा भाऊ म्हणूनच संबोधतात. अनेक आदिवासी वाघाला देव मानतात. आजपर्यंत मेळघाटातील १९ गावांचे झालेले योग्यरितेने झालेले पुनर्वसन त्यात वाघांच्या अधिवासाठी तयार केलेल्या पूरक गोष्टी त्यामुळेच वाघ आणि आदिवासी यांच्यात होणारा संघर्ष टळल्याचा दावा वन्य जीव अभ्यासक यादव तरटे यांनी केला आहे.

वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांची प्रतिक्रिया

मध्य भारतातील मोठे अभयारण्य -

मेळघाट हे मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले अभयारण्य आहे. या पर्वत रांगांना गाविलगड पर्वतरांग असेही संबोधले जाते. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार या पाच नद्या वाहतात. त्या पुढे जाऊन तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भांडार आहे. या घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. विविध प्राणी, जैवसंपदा आणि वनांनी समृद्ध असा प्रदेश आहे.

१९ गावांचे पुनर्वसन -

मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि चार वन्यजीव अभयारण्य आणि एक प्रादेशिक विभाग मिळून तब्बल २९१ खेडेगाव आहेत. १९९८ पासून ते आजपर्यंत मेळघाटातील तब्बल १९ गावांचे पुनर्वसन योग्यरीतीने झाल्याने मेळघाटातील वाघांचा आकडा वाढत जात आहे. असे तरटे यांनी सांगितले. मेळघाटातील तापी, सिपणा, खंडु, डोलार, गडगा या नद्यांच्या पात्रात पाणी उपलब्ध असल्याने वाघांचा मनुष्यवस्तीकडे संचार कमी असतो. लोकसंख्या आणि गुरांची संख्या मोठी असूनही वाघांनी केलेल्या हल्ल्याचे प्रमाण अतिशय तुरळक आहे. राज्यात गेल्या काही वर्षात वाघांचे माणसावर होणारे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असताना एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात याचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. मात्र दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात हल्ल्याची एकही घटना घडत नसल्याचा दावा वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी केला आहे. मागील घटनांवर दृष्टिक्षेप टाकला, तर असे आढळून येईल की इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत मेळघाटात या संघर्षाचे प्रमाण तुरळक आहे.

वाघाच्या सुरक्षेसाठी वनविभागाचे प्रयत्न-

काही वर्षात शिकार प्रतिबंधक दलाची कामगिरी पाहता वाघासारखे प्राणी मुक्तपणे संचार करु लागले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी जागोजागी पाणवठे तयार करणे, ट्रॅप कॅमेरा लावणे तसेच मानव विषप्रयोग करू नये, याची काळजी घेतली जात आहे. मेळघाटातील तब्बल चार हजार चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा ठिकाणी माणसाला पोचणे शक्‍य नसल्याने वाघ तिथे सुखाने नांदत आहे.

पर्यटकांना आकर्षण -

मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणातील वाघ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. ६ व ७ मे रोजी मेळघाटमध्ये प्राण्यांची गणना करण्यात आली. त्यानुसार, मेळघाटात १७ हजार १८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.