ETV Bharat / state

Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडले; काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा - अप्पर वर्धा धरण ओव्हरफ्लो झाले

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ७ दारे ४५ सेंटीमीटरने उघडल्याने, धरण ८०टक्के भरले आहे. काल रात्री दहाच्या सुमारास धरणाचा विसर्ग ५०० क्युमेक वरून ७५० ते ८०० क्युमेक एवढा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

The Upper Wardha Dam
अप्पर वर्धा धरण
author img

By

Published : Jul 15, 2022, 3:44 PM IST

अमरावती: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ७ दारे ४५ सेंटीमीटरने उघडले आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसत आहे. धरण ८०टक्के भरले आहे. काल रात्री दहाच्या सुमारास धरणाचा विसर्ग ५०० क्युमेक वरून ७५० ते ८०० क्युमेक एवढा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातुन पाण्याचा विसर्ग होतांना चे दृश्य

मध्य प्रदेशातील नद्यांना पूर: वर्धा नदीचे पाणलोट क्षेत्र मध्य प्रदेशात आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाला. मध्य प्रदेशातून वाहत येणाऱ्या जाम, माडू नदिला मोठ्या प्रमाणात पुर आल्याने गेल्या दोन तीन दिवसांत जलाशयाच्या साठ्यात प्रचंड वाढ झालेली आहे. हवामान खात्याच्या विभागाने अमरावती जिल्ह्यात तसेच अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात तीन ते चार दिवस जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे. यामुळे अप्पर वर्धा धरणातील गावांना देखील सतर्क करण्यात आले आहे .

बगाजी धरणाचेही 11 दारी उघडली: जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात असणाऱ्या बगाजी धरणाचे 31 पैकी 11 दरवाजे 60 सेंटिमीटर पर्यंत उघडण्यात आले आहे. केवळ पाच दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळेच बघायची धरण तुडुंब भरले आहे.

हेही वाचा: Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; शिरजगाव कसबा गावात शिरले पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.