ETV Bharat / state

MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांच्या जन्मतारखा दोन असल्याचा ठाकरे गटाचा आरोप - नवनीत राणा हिंदू कशा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनिल खराटे यांनी टीकास्त्र सोडले आहे. खासदार नवनीत राणा यांच्या दोन जन्मतारखा असून त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा आरोप खराटे यांनी केला आहे.

सुनिल खराटे
Sunil Kharate
author img

By

Published : Apr 4, 2023, 4:39 PM IST

ठाकरे गटाचा आरोप, ठाकरे गटाचा आरोप

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जन्मतारखा देखील दोन आहेत. विशेष म्हणजे आता 6 एप्रिलला हनुमान जयंती असून खासदार नवनीत राणा यांच्या एका टीसीवर त्यांची जन्मतारीख 6 एप्रिल 1985 अशी आहे. तर, त्यांच्या जातीचा उल्लेख शीख असा आहे. हनुमान जयंती, आपला वाढदिवस एकाच दिवशी आला असल्याचे त्या आनंदाने सांगत आहेत.

स्पष्टीकरण द्या : दुसरीकडे त्यांच्या जातीच्या खोट्या प्रमाणपत्रासाठी टीसी लावण्यात आली आहे. त्यावर त्यांची जन्मतारीख 15 एप्रिल 1985 अशी आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर मोची असा त्यांच्या जातीचा उल्लेख आहे. हनुमान जयंतीसोबत जर त्यांनी आपल्या वाढदिवसाचा उदोउदो केला तर, त्यांनी खोट्या प्रमाणपत्राच्या अधारे लोकसभा निवडणूक फसवणूक करुन लढवल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सुनिल खराटे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे खरे जात प्रमाणपत्र कोणते? तसेच जन्म तारखे स्पष्टीकरण द्याला, हवे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

नवनीत राणा हिंदू शेरनी कशा? : आम्हाला कोणत्याही जाती धर्माचा अपमान करायचा नाही. मात्र, सदैव हिंदुत्वासाठी उभे ठाकणारे आमचे नेते उद्धव ठाकरे यांचा खासदार नवनीत राणा यांनी भाईजान असा उल्लेख करणे योग्य नाही. अमरावती शहरात आतापर्यंत मुस्लिमांच्या सणांमध्ये तसेच त्यांच्या उत्सवात मुस्लिम पेहरावात खासदार नवनीत राणा यांचे पती अनेकदा सहभागी झाले आहेत. मुस्लिमांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांचा पेहराव घालण्याची नौटंकी करणे गरजेचे नाही, अशी टीका त्यांनी खासदार राणांवर केली आहे.

स्वार्थासाठी नौटंकी : राणादांपत्य स्वतःच्या स्वार्थासाठी अशा नौटंकी करणाऱ्या नवनीत राणा या हिंदू शेरनी कशा, असा सवाल देखील सुनील खराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला. अमरावती शहरात घडलेल्या उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपी हा राणा यांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता होता, हे जग जाहीर झाले आहे. आता हनुमान जयंतीच्या पर्वावर खासदार नवनीत राणा ह्या मोठा उत्सव साजरा करीत आहेत. उत्सव साजरा करणे ही आनंदाची बाब आहे. मात्र, हनुमान चालीसा कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आमच्या नेत्यांबाबत चुकीचा उल्लेख करणे हा हिंदुत्ववाद नाही, असे देखील सुनील खराटे यांनी म्हटले आहे.

गब्बरच्या इशाऱ्यावर नाचते बसंती : शोले सिनेमामध्ये विरूला दोराने बांधल्यावर त्याच्यासमोर काचा टाकून त्यावर गब्बर बसंतीला नाचायला लावतो. गब्बरच्या इशाऱ्यावर बसंती नाचायला लागते. अगदी तसाच प्रकार सध्या नवनीत राणा यांच्याबाबत महाराष्ट्रात सुरू असल्याचा आरोप देखील सुनील खराटे यांनी केला. त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे स्पष्ट असल्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणे भाग पडत आहे, असे देखील सुनील खराटे म्हणाले. नवनीत राणा ह्या खरोखर खऱ्या आहेत मग यांच्यात जातीच्या प्रकरणात त्यांच्या वडिलांना न्यायालयाने फरार घोषित करणे हे कोणालाही न पटणारे आहे.

हेही वाचा - Ghar Ghar Savarkar : शिवसेना ठाकरे गटाकडून आता घर घर सावरकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.