अमरावती - रात्री अपरात्री एकट्या किंवा समुहात असलेल्या महिलांना मदत लागल्यास आता अमरावती पोलीस एका फोनवर त्यांना थेट घरी सोडणार आहेत. देशभर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना पाहता सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
हेही वाचा - वाशिम : रात्री १० ते पहाटे ५ यावेळेत एकट्या महिलांना पोलीस पोहोचविणार घरी..
शहर तथा ग्रामीण पोलिसांनी या सेवेसाठी सर्व पोलीस ठाण्यांचे फोन नंबर जारी केले आहेत. या क्रमांकांवर फोन केल्यास महिलांना तत्काळ मदत मिळणार आहे. महिला काही कामानिमित्त घराबाहेर पडली असेल आणि तिला रात्री घरी परतणे असुरक्षित वाटत असेल तर पोलिसांसोबत संपर्क साधल्यास त्या महिलेला पोलीस सुरक्षितपणे घरी पोहोचवून देतील.