ETV Bharat / state

अमरावतीच्या कुऱ्हा गावात नवरा अन् सासऱ्याने विवाहितेला पेटवले - रॉकेल

अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा गावातील रोशनी गोलू पानसे या २३ वर्षीय महिलेला कौटुंबीक वादातून नवरा आणि सासऱ्याने रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिले. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुऱ्हा गावात नवरा आणि सासऱ्याने विवाहितीला पेटवले
author img

By

Published : Jul 22, 2019, 8:48 PM IST

अमरावती - कौटुंबीक वादातून विवाहितेचा छळ करून विवाहितेला तिच्या नवऱ्याने व सासऱ्यानेच रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख या गावात १५ जुलैला घडली. याप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी पीडित महिलेच्या बयानावरून २० तारखेला पती व सासऱ्याला अटक केली आहे.

अमरावतीच्या कुऱ्हा गावात नवरा आणि सासऱ्याने विवाहितीला पेटवले

अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा गावातील रोशनी गोलू पानसे ही २३ वर्षीय विवाहिता या घटनेत गंभीर भाजली आहे. रोशनी हिचा पती गोलू हा तिला वारंवार तू पसंत नाही, असे म्हणून तिचा नेहमी छळ करत होता. दरम्यान, घटनेच्या दिवशी रोशनी स्वयंपाक खोलीत काम करत असताना आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे हे स्वयंपाक खोलीत जाऊन रोशनीला स्वयंपाक का केला नाही, असे म्हणत तिच्याशी वाद घातला.

नवरा गोलूने तिच्या अंगावर रॉकेल ओतल्याने ती जीव वाचवण्यासाठी पळत असताना सासरा मुन्ना याने तिला पकडले. त्यानंतर नवऱ्याने तिला पेटवून दिले. आगीने जळत असलेली रोशनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडत असताना गावकऱ्यांनी तिला वाचवले. त्यानंतर तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Intro:धक्कादायक-अमरावतीच्या कुऱ्हा गावात नवरा आणि सासऱ्याने विवाहितीला पेटवले.

अमरावती अँकर 

कौटुंबिक वादातून विवाहितेचा छळ करून विवाहितेला तीच्या नवऱ्याने व सासऱ्यानेच रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख या गावात 15 तारखेला घडली .ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी गंभीर पणे भाजलेल्या पीडित महिलेले  अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती करून तिच्यावर सध्या उपचार सुरू असून आरोपी पती व सासऱ्याला शिरजगाव कसबा पोलिसांनी 20 तारखेला पीडित महिलेच्या बयाना वरून अटक केली आहे.

अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील कुऱ्हा गावातील रोशनी  गोलू पानसे या 23 वर्षीय विवाहित ही यात गंभीर भाजली आहे.रोशनी हीचा  पती गोलू हा तिला वारंवार तू पसंत नाही असे म्हणून तिचा नेहमी छळ करत होता .दरम्यान घटनेच्या दिवशी रोशनी स्वयंपाक खोलीत गॅस वर पाणी गरम करत असताना आरोपी पती गोलू पानसे व सासरा मुन्ना पानसे हे स्वयंपाक खोलीत जाऊन रोशनीला स्वयंपाक का केला नाही असे म्हणून तिच्याशी वाद घातला नंतर तिचा नवरा गोलुने तिच्या अंगावर रॉकेल ओतले दरम्यान जीव वाचवण्यासाठी पळत जात असताना सासरा मुन्ना याने तिला पकडून मग तिच्या नवऱ्याने तीला पेटून दिले.आगीने जळत असलेली रोशनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडत असताना गावकऱ्यांनी आग विझवून तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.