ETV Bharat / state

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; ग्रामपंचायतमध्ये येणार महिला राज - ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर ( Gram Panchayat Elections in Nandgaon Khandeshwar ) तालुक्यातील 17 ग्रामपंचायतिच्या निवडणुकीसाठी ( Gram Panchayat Elections ) सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता ( Code of Conduct for Election of Gram Panchayats ) लागू झाली आहे.

Gram Panchayat Elections
Gram Panchayat Elections
author img

By

Published : Nov 27, 2022, 9:47 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर ( Gram Panchayat Elections in Nandgaon Khandeshwar ) तालुक्यातील 17 ग्रामपंचायतिच्या निवडणुकीसाठी ( Gram Panchayat Elections ) सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील कोदोरी,माऊली चोर, चिखली वैद्य, सावनेर, शेलुगुंड, येवती, लोहगाव या ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी सरपंचपद आरक्षित ( Sarpanch post is reserved for women in Gram Panchayat ) आहेत. तालुक्यात 17 सरपंच तर, 135 ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणूक होणार आहे.

अशी आहे मतदारसंघ रचना - सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील 17 ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच पदासाठी नोटीस प्रसिद्ध करण्चात आली आहे. दरम्यान कोदोरी,माऊली चोर,चिखली वैद्य,सावनेर, शेलुगुंड, येवती,लोहगाव महिलेसाठी राखीव आहे. तर, कोदोरी,चिखली वैद्य,सावनेर, शेलुगंड, येवती,लोहगाव येथे सर्वसाधारण स्त्री तर माऊली चोर येथे नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री व साखरा,पुसनेर, रोहणा,पाळा येथे नागरिकाचा मागास प्रवर्ग तर खिरसाना वडाळा, काजना येथे सर्वसाधारण तर खेड पिप्री, पिंपळगाव बैनाई,भागुरा येथे अनुसूचित जाती असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे यामध्ये 135 ग्रामपंचायत सदस्यासाठी तर 17 सरपंच पदाची निवणुक होणार आहे .

सोमवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात - ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असून त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी, तर मतमोजणी दोन दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी होईल.

थंडीत राजकारण तापणार - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे लक्ष देण्यात येत आहे. सर्वच पक्ष निवडणुक रिंगणात उतरल्याने उमेदवारांची पळवापळवी सुरु झाली आहे. थंडीच्या गारव्यात सरपंच पदाचे राजकारण गावच्या पुढार्‍यांकडून चांगलेच तापवताना दिसत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील पुढारीसुद्धा लक्ष देऊन आहेत.

गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण
१) कोदोरी - सर्वसाधारण स्त्री
२) खिरासाना - सर्वसाधारण
३) माऊली चोर - नामाप्र स्त्री

गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण

४) साखरा - नामाप्र
५) पुसनेर - नामाप्र
६) चिखली वैद्य - सर्वसाधारण स्त्री

गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण

७) वडाळा - सर्वसाधारण
८) खेड पिंपरी - अनुसूचित जाती
९) सावनेर - सर्वसाधारण स्त्री

गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण

१०) रोहणा - नामाप्र
११) पिंपळगाव बैनाई - अनुसूचित जाती
१२) शेलगुंड - सर्वसाधारण स्त्री

गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण

१३) येवती - सर्वसाधारण स्त्री
१४) लोहगाव - सर्वसाधारण स्त्री
१५) काजना - सर्वसाधारण
१६) पाळा - नामाप्र
१७) भगुरा - अनुसूचित जाती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.