ETV Bharat / state

Teachers Federation : शिक्षक महासंघाचा नुटासोबत घरोबा; अमरावती विद्यापीठात सिनेटची निवडणूक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ( Sant Gadgebaba Amravati University ) सिनेटची निवडणूक होत आहे. या निवडणूकीत 'नुटा' पॅनलदवारे आपले उमेदवार उभे करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी होणारे मतदान अवघ्या काही तासांवरच आले असताना शिक्षक महासंघाने नुटा या संघटनेला दिलेल्या पाठिंबाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Teachers Federation
अध्यक्ष शेखर भोयर
author img

By

Published : Nov 20, 2022, 12:53 PM IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ( Sant Gadgebaba Amravati University ) सिनेटची निवडणूक होत आहे. या निवडणूकीत 'नुटा' पॅनलद्वारे आपले उमेदवार उभे करण्यात आले आहे. 'नुटा'च्या सर्व उमेदवारांना शिक्षक महासंघातर्फे पाठींबा ( Candidates are supported by Teachers Federation ) जाहीर करण्यात आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर ( Founder President of Teachers Federation ) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सिनेट निवडणुकीसाठी होणारे मतदान अवघ्या काही तासांवरच आले असताना शिक्षक महासंघाने नुटा या संघटनेला दिलेल्या पाठिंबाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अध्यक्ष शेखर भोयर

नोटा कायम मैदानात : विद्यमान आमदारांनी पदवीधरांसाठी किंवा इतर कुठल्याच घटकांसाठी काहीही काम केले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शिक्षकांच्या हितासाठी गेल्या बऱ्याच काळापासून 'नुटा' झटत आहे. पदवीधरांचे प्रश्न, पदवी वितरण असेल विद्यार्थी त्यांच्या सर्व प्रश्नांसाठी नोटा कायम मैदानात असल्याची माहिती भैय्यासाहेब मेटकर यांनी यावेळी दिली. पत्रपरिषदेला भैय्या साहेब मेटकर, प्रा. नितीन टाले, प्रा. जगदीश गोवर्धन हे शिक्षक महासंघाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते.

असे आहे विद्यापीठातील राजकारण: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना 1983 मध्ये झाली. त्यानंतर सिनेटची पहिली निवडणूक 1989 मध्ये घेण्यात आली होती. पहिल्या निवडणुकीपासूनच नुटा ही संघटना विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय आहे. प्राध्यापक बीटी देशमुख यांच्या नेतृत्वात या संघटनेचे अमरावती विद्यापीठावर वर्चस्व कायम राहिले आहे. नुटाच्या विरोधात सुक्टा अर्थात संत गाडगेबाबा अमरावती अमरावती युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने पहिल्यांदा 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत पॅनल घोषित केले होते. सुक्टाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर संतोष ठाकरे हे स्वतः 2002 मध्ये झालेल्या सिनेट निवडणुकीत नुटाचे दिग्गज उमेदवार प्राध्यापक प.सी काणे यांना पराभूत करून निवडून आले होते. त्यानंतर डॉक्टर संतोष ठाकरे यांनी 2005 मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ टीचर्स असोसिएशन ही नवी संघटना स्थापन केली. 2005 आणि 2010 या दोन्ही निवडणुकीत नुटा आणि सुक्टा एकमेकांविरोधात होत्या. 2017 च्या निवडणुकीत मात्र सुक्टा मधील अनेक सदस्य हे प्राचार्य झाले आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्राचार्य फोरम या नव्या संघटनेची स्थापना झाल्यामुळे सुक्टामधील अनेक सदस्य नुटामध्ये गेले तर प्राचार्य फोरम ही संथटना विद्यापीठाच्या राजकारणात नव्याने समोर आलेल्या शिक्षण मंचला रोखण्यासाठी नुटा सोबत होती. 2017 ची निवडणूक ही विद्यापीठाच्या नव्या कायद्यानुसार झाली होती. या निवडणुकीत नुटाचे 37 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. राज्यपाल आणि कुलगुरू नामीत सदस्यांमध्ये सर्व शिक्षण मंचाचे सदस्य सभागृहात आले होते.

नुटा पुन्हा सज्ज: नुटा यावेळी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात निवडणूक लढवीत आहे. व्यवस्थापन परिषदेत देखील नोटाचे समर्थक प्रतिनिधी लढत देत आहेत. आतापर्यंत उमेदवारांच्या अर्जांची जी छाननी झाली त्यामध्ये नुटाचे दोन उमेदवार अविरोध निवडून आले असल्याची माहिती नुटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. 2017 च्या निवडणुकीत नुटाला 70 टक्के यश मिळाले होते. या निवडणुकीत देखील नुटा पूर्ण ताकदीने उतरली असून राज्य आणि केंद्र स्तरावर शिक्षकांच्या संबंधित मागण्यासाठी आघाडीवर असणाऱ्या आमच्या संघटनेला या निवडणुकीत भरगोस यश प्राप्त होईल, असा विश्वास प्राध्यापक डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.