ETV Bharat / state

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर ; 1 डिसेंबरला मतदान - divisional commissioner of amravati

निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर केली असून 1 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२०
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर
author img

By

Published : Nov 3, 2020, 5:52 PM IST

Updated : Nov 3, 2020, 8:54 PM IST

अमरावती - निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर केली असून 1 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर
निवडणूक कार्यक्रम

5 नोव्हेंबरला निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 12 नोव्हेंबरपर्यंत 10 हजार रुपयांच्या अनामत रकमेसाह नामनिर्देशन पत्र विभागीय आयुक्तालयात दाखल करावे लागणार आहे. 13 नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून उमेदवारांना 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 1 डिसेंबरला सकळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी करून निकाल घोषित होणार आहे. 7 डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

मतदारांची जिल्हा निहाय संख्या

पुरुष / महिला / इतर / एकूण

अमरावती - 6793 / 3295 / 00 / 10088

अकोला - 4099 / 1901 / 01 / 6000

वाशिम - 3145 / 627 / 00 / 3773

बुलडाणा - 5927 / 1495 / 00 / 7422

यवतमाळ - 5614 / 1793 / 00 / 7507

एकूण - 25578 / 9111 / 01 / 34690

प्रस्तावित मतदान केंद्र जिल्हा मुख्य सहाय्यकारी केंद्र क्रमांक

अमरावती - 25 00 1 ते 25

अकोला - 12 00 26 ते 37

बुलडाणा - 13 01 38 ते 50

वाशिम - 06 01 51 ते 56

यवतमाळ - 19 01 57 ते 75

एकूण - 75 02 77

आदर्श आचार संहिता लागू

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 2 नोव्हेंबरपासून अंमलात आली असून प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक उपविभाग भरारी पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम तयार करण्यात येत आहे. मास्कशिवाय मतदानाचा हक्क नाही. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने सोबत फक्त अन्य दोघांना आणावे. उमेदवारासह तीनहून अधिक व्यक्ती आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Last Updated : Nov 3, 2020, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.