ETV Bharat / state

"अमरावतीचा नटरंग..." राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त स्वप्नील विधातेची वेगळ्या अस्तित्त्वासाठी धडपड - lavni kalakar swapnil vidhate

दिल्लीच्या 'के.टी.के आउट स्टॅंडिंग अचिव्हर्स अँड फाउंडेशन' च्या वतीने स्वप्नीलला मानाचा असलेला 'भारत गौरव' या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलं आहे. विविध क्षेत्रातील 45 नामवंत व्यक्तीना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

स्वप्नील विधातेची कथा
स्वप्नील विधातेची कथा
author img

By

Published : Jul 16, 2021, 9:22 AM IST

Updated : Jul 18, 2021, 12:24 AM IST

अमरावती - खरंतर लावणी ही पहिल्यापासून महिलांची मक्तेदारी. मात्र, त्यात अमरावतीचा स्वप्नील विधाते या तरुणाने आपले वेगळे अस्तित्त्व निर्माण करत आहे. मुलगा आहेस आणि तरीही लावणी करतोस किंवा नाच करतोस म्हणून छक्क्या आणि बायल्या अशा प्रकारचे टोमणेही त्याला सहन करावे लागत आहेत. तरीही त्याचा उत्साह जराही कमी झालेला नाही.

अमरावतीचा नटरंग...

दिल्लीच्या 'के.टी.के आउट स्टॅंडिंग अचिव्हर्स अँड फाउंडेशन' च्या वतीने स्वप्नीलला मानाचा असलेला 'भारत गौरव' या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलं आहे. विविध क्षेत्रातील 45 नामवंत व्यक्तीना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

भारत गौरव पुरल्काराने सन्मानित
भारत गौरव पुरल्काराने सन्मानित

लावणीसाठी करावा लागला संघर्ष
स्वप्निल हा अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा गावी राहतो.त्याचे वडिल हे प्रसिध्द पहेलवान आहेत. त्यामुळे त्याने एखादा नोकरी आणि व्यवसाय करावा ही पालकांची इच्छा होती. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या स्वप्नीलला लावणीची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्याने तडक मुंबई गाठली. पयाच्या पंधरा वर्षापासून नृत्य करणाऱ्या स्वप्नीलने आता चांगलाच जम बसवला आहे.

स्वप्नील विधाते
स्वप्नील विधाते

अनेकांना मिळवून दिला रोजगार
स्वप्निल ने अमरावती, यवतमाळ, पुणे आणि मुंबईतील लावणी कलावंत एकत्र आणले. कोल्हापूर, मुंबई, पुणेसह मध्यप्रदेशात इंदोरलाही स्वप्नीलच्या लावणीने वाहवा मिळविली.अलका कुबल यांच्यासह भारत गणेशपुरे, आशिका सुर्यवंशी, माधुरी पवार अनुप जलोटा यांनी स्वप्नीलच्या कलेला दाद दिली. आज स्वप्नीलचा स्वतःचा 'मदमस्त गुलछडी लावणी मंच' आहे. आज या लावणी मांचच्या एका शोसाठी ४० ते ५० हजार रुपये मिळतात. स्वप्नील एकटा कला सादर करण्यासाठी ८ ते १० हजार रुपये घेतो.स्वप्निल हा लावणी सम्राट आहे त्याच्या समूहाचा तो प्रमुख आहे .स्वप्नील ने त्याच्या सोबतच तीस तरुण आणि तरुणी यांना रोजगार दिलेला आहे .त्यामुळे त्यांच्याही कुटुंबाला हातभार लागली आहे.

कोरोनामुळे परिस्थिती बिकट
लॉकडाऊन मुळे बिकट परिस्थिती असल्याच स्वप्निल विधाते सांगतो. यापूर्वी मी सात ते आठ लाख रुपये मला मिळत असे. त्यातून कुटुंबाला मोठा हातभार लागत असे. आमच्या टीमला या लावणी क्षेत्रातून मोठा फायदा झाला होता. परंतु मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे आमचे लावणीचे कार्यक्रम बंद आहेत.

हेही वाचा - केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मिळावा.. छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Last Updated : Jul 18, 2021, 12:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.