ETV Bharat / state

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला हजेरी

author img

By

Published : Feb 5, 2021, 10:04 AM IST

Updated : Feb 5, 2021, 12:18 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यांनी राष्ट्रवादी परिवार सवांद यात्रेच्या मोर्शीतील कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

अमरावती
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला हजेरी

अमरावती - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजु शेट्टी यांच्या पासून दूर असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्ह्यातील आमदार देवेंद्र भुयार यांची काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक वाढली आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढलेल्या राष्ट्रवादी परिवार सवांद यात्रेच्या मोर्शीतील कार्यक्रमाला देखील आमदार देवेंद्र भुयार यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवऱ्या उंचावल्या आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या पासून नाराज असलेले आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादीच्या वाटेवर तर नाहीत ना अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदान संघाचे युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचे समर्थन घेऊन निवडणूक आलेले देवेंद्र भुयार मात्र अलीकडच्या काही महिन्या पासून राजू शेट्टी यांच्या पासून दूर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर तिकडे मात्र देवेंद्र भुयार यांची राष्ट्रवादीशी कमालीची जवळीक वाढली आहे. काही महिन्यापूर्वी मंत्री धनंजय मुंडे सह अनेक नेत्यांच्या भुयार यांनी भेटी घेतल्या होत्या. मात्र, आता तर राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार देवेंद्र भुयार यांनी हजेरी लावल्याने राजकिय क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वर नाराज असलेले देवेंद्र भुयार आगामी काळात हाताला राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

भाजप नेते अनिल बोंडे विरोधात भुयार यांना राष्ट्रवादीचे पाठबळ?

भाजपचे नेते डॉ अनिल बोंडें यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख व काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी देवेंद्र भुयार यांना पाठिंबा दिला होता. आता देवेंद्र भुयार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख यांचं पाठबळ आहे. त्यामुळे अनिल बोंडें यांच्या विरोधात उभं राहण्यासाठीदेवेंद्र भुयार यांना राष्ट्रवादीकडून पाठबळ मिळतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

म्हणून मला मंत्रिपद मिळाले नाही.

ज्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याला राजकीयदृष्ट्या संधी मिळते. त्यावेळेस पक्षातील मोठे नेते स्वार्थ जपण्यासाठी बाकीच्या कार्यकर्त्याचा बळी घेतात. असा गंभीर आरोपही भुयार यांनी नाव न घेता संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यावर काही महिन्यांपूर्वी केला होता. तोच प्रकार माझ्या सोबत घडला आहे असे मला वाटायला लागले आहे, असेही भुयार म्हणाले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक मंत्रिपद देण्याचे ठरवले होते. मात्र, संघटनेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी तिथे आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही.

Last Updated : Feb 5, 2021, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.