ETV Bharat / state

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत सिंचन निर्माण होणे आवश्यक - बच्चू कडू

शाश्वत सिंचनासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज बेलोरा येथे केले. चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा, सालोरी व राजूरा अशा अनेक गावांत नदी खोलीकरणाची कामे राबविण्यात आली.

bacchu kadu latest news
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत सिंचन निर्माण होणे आवश्यक - बच्चू कडू
author img

By

Published : Jun 14, 2021, 6:59 PM IST

अमरावती - शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत सिंचन निर्माण होणे आवश्यक आहे. शाश्वत सिंचनासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज बेलोरा येथे केले. चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा, सालोरी व राजूरा अशा अनेक गावांत नदी खोलीकरणाची कामे राबविण्यात आली. पावसामुळे अशा ठिकाणी जलसंचय निर्माण होऊ लागला आहे.

सिंचनाचे उपक्रम राबविण्यास चालना -

शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी नदी नाल्याचे खोलीकरण, सिमेंट बंधारे, ढाळीचे बांध आदींच्या माध्यमातून पाण्याची बचत केल्यास याचा फायदा शेतीपिकांचे उत्पादन वाढविण्यास महत्त्वपूर्ण ठरते. सिंचनाअभावी कृषी उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम होतो. मात्र, सिंचनाचे विविध उपक्रम राबवून ठिकठिकाणी जलस्त्रोत निर्माण झाल्यास रब्बी व खरीप, अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. पर्यायाने शेतपीक उत्पादनात वाढ होईल. त्यामुळे अशा अधिकाधिक उपक्रमांना चालना देण्यात येईल.

नदी नाल्यांचे खोलीकरण -

मागील वर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी जलसंपदा प्रकल्पातील पाणी बचतीसंबंधीचे नियोजन करण्यासाठी राज्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिमेंट बंधारे, नदी, नाल्यांचे खोलीकरण उपक्रम आदी बाबींना चालना देण्यात आली आहे.

हेही वाचा - दहावी-बारावी निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार - शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.