ETV Bharat / state

Sushma Andhare: नवनीत अक्का बोलती क्यू नही; सुषमा अंधारे यांचा जाहीर सभेत सवाल - मोदींवरच मुक्ताफळ उधळण्याचे काम

नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र हरवले असेल तर त्यांनी वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र दाखवावे, मात्र त्यांचे वडील तर आधीच फरार झाले आहेत. त्यांनी भावाचे किंवा बहिणीचे, काका, मामा किंवा कोणाचाही जातीचे प्रमाणपत्र दाखवून आपण अनुसूचित जातीचे आहे हे सिद्ध करावे. मात्र त्या असे काहीही करत नाही. जातीच्या प्रमाणपत्राबाबत विचारले तर नवनीत अक्का बोलती क्यू क्यू नही असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बडनेरा येथे शुक्रवारी रात्री आयोजित जाहीर सभेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली.

sushma andhare contents on navneet rana
सुषमा अंधारे यांचा जाहीर सभेत सवाल
author img

By

Published : Mar 4, 2023, 10:35 AM IST

Updated : Mar 4, 2023, 11:03 AM IST

सुषमा अंधारे यांची अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका

अमरावती: खासदार नवनीत राणा ह्या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. याचा समाचार घेत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांची खिल्ली उडवली आहे. मोदींना बच्चा म्हणणाऱ्या नवनीत राणा आता उधळत आहेत. मोदींवर मुक्ताफळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा आधार घेऊन लोकसभा निवडणूक लढवताना मोदींच्या विरोधात प्रत्येक भाषणात आग ओकतांना शरद पवार यांचा उल्लेख बाप बाप होता है असे करीत, मोदींचा उल्लेख बच्चा म्हणून करीत होत्या. आता निवडून आल्यावर मात्र त्यांनी रंग बदलला असून ज्या मोदींवर टीका करून त्यांनी मत मिळवली, आज त्या मोदींवरच मुक्ताफळ उधळण्याचे काम नवनीत रणा करीत असल्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला.

खोटे बोलण्यात आणि फसवणूक करण्यात नवनीत राणा माहीर: वादग्रस्त विधान करत केवळ चर्चेत राहणाऱ्या नवनीत राणा ह्या खोटे बोलण्यात आणि लोकांची फसवणूक करण्यात तसेच नवटंकी करण्यात माहीर असल्याचे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या. चार ते पाच महिने आधी नवनीत राणा म्हणाल्या उद्धव ठाकरे दम नाही. त्यांच्या ह्या वाक्यावर आपल्याला काय बोलायचे. अशा बोलण्यावर आपण काय विचार करायचे आपण चांगली माणस आहोत. आपण सज्जन आणि सभ्य माणस आहोत. अक्काला मराठी बोलता येत नाही मराठीतले अर्थ समजत नाही. त्यामुळे बिचारी अक्का असे काहीही बोलली. तरीपण आपण उद्धव ठाकरेंमध्ये दम आहे की नाही हे अक्काला सांगितले पाहिजे. पाठची बहीण म्हणून मी उद्धव ठाकरेंना वचन दिले आहे की, तुमच्यावर कोणी टीका करत असेल तर त्यांना मी आपण काय आहोत ते दाखवून देईल.

उद्धव ठाकरेंनी सात महिन्यांपासून सगळ्यांना लावले कामी: उद्धव ठाकरे यांच्यात किती दम आहे. हे नवनीत राणांना समजून घ्यायचे असेल तर गेली सात महिने 40 गद्दार, 105 भाजपचे आमदार. पक्षपाती राज्यपाल, आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र अशा तीन-तीन राज्यांच्या यंत्रणा दोन राज्यांचे गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान एवढेच नव्हे तर ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आणि व्हाट्सअप तसेच फेसबुक वरील हजारो लावारिस पेड फॉलोवर्स या सगळ्यांना सात महिन्यांपासून ज्यांनी कामाला लावला आहे. ते उद्धव ठाकरे आहेत यामुळे आमचा नाद करायचा नाही हे कुणीतरी नवनीतरणांना सांगावे असे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा: Sushma Andhare News संजय राऊत यांचे व्यक्तव्य भाजपलाच का झोंबले सुषमा अंधारे

Last Updated : Mar 4, 2023, 11:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.