ETV Bharat / state

कोरोनापासून दूर सावरखेड; जिल्ह्यातील ग्रामीण भाग लढा यशस्वी - कोरोनाविरुद्ध लढाई

अमवतील जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील सावरखेड या गावातील नागरिक सतत हात धुणे, गावाबाहेरुन येताच अंघोळ करणे, सामाजिक अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावणे या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत कोरोनाविरोधातील युद्धात चांगला लढा देत आहेत.

जनजागृती करणारे विद्यार्थिनी
जनजागृती करणारे विद्यार्थिनी
author img

By

Published : May 6, 2020, 7:30 PM IST

अमरावती - अमरावती शहरापर्यंत कोरोना धडकला असला तरी जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना विरोधातील लढ्यात चार हात करत आहेत. जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील सावरखेड या गावात कोरोनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वालगाव येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सारसावल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सतत हात धुवा, स्वच्छता राखा, असा संदेश हे विद्यार्थी ग्रामस्थांना देत आहेत. ग्रामस्थही याचा सकारात्मक प्रतिसाद देत असून सावरखेड कोरोनापासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे.

आाढावा घेताना प्रतिनिधी

हात नेमके कसे धुवायचे याचे प्रात्यक्षीकही विद्यार्थी गावातील वृद्धांना करून दाखवत आहेत. महिनाभरापासून विद्यार्थ्यांनी केलेल्या जनजागृतीचा परिणाम गावात दिसतो आहे. गवात कोणीही तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडत नाही. गावातून अमरावतीला दूध विक्रीला जाणारे लोक गावात परत येताच आंघोळ करतात. विशेष म्हणजे गावाबाहेरुन येणारे व्यक्ती जोपर्यंत आंघोळ करून स्वछ होत नाहीत तोर्यंत त्यांना जवळही कोणी उभे करत नाही.

गावात येणारा भाजी विक्रेताही तोंडाला मास्क लावून भाजी विक्री करतो. गावात कोरोना विषयक जनजागृती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गावात स्वतः कीटकनाशक फवारणी केली. सध्या शेतीच्या कामाला कोणीही मजूर जात नाही. शेतकरी आपल्या शेतात एकटाच राबत असल्याने शेतात अधिक माणस एकत्र येत नाहीत. यामुळे सामाजिक अंतराचे नियमही पाळले जात आहे.

संत गाडगेबाबा महाविद्यलायातील राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. प्रिया खोरगडे यांनी विद्यार्थ्यांना कोरोना जनजागृतीसाठी प्रेरित केले आहे. या महाविद्यालयाचे विद्यार्थी सावरखेड प्रमाणेच वालगाव आदी लगतच्या गावातही कोरोना विरोधात जनजागृती करत आहेत. विशेष म्हणजे वालगाव, सावरखेडच नाही तर अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यास सर्व ग्रामस्थ यशस्वी होतानाचे चित्र आहे.

हेही वाचा - कवळ्याच्या पिकाला ग्राहक मिळेना; बग्गी येथील शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.