ETV Bharat / state

दिलासादायक : राज्यात कोरोना काळात ५६० बालविवाह रोखण्यात यश - मंत्री यशोमती ठाकूर

बालविवाह रोखण्यासाठी माहिती व्यवस्था कार्यक्रम करण्याची गरज आहे. असे मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्याकरीता अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक, ग्रामपंचायत यंत्रणाशी समन्वयाने काम करावे, समाज माध्यमे, कलापथके व अन्यत्र कलाकृती प्रचार साहित्य यावर भर द्यावा. अशी मागणी अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

Success in preventing child marriage
मंत्री यशोमती ठाकूर
author img

By

Published : May 27, 2021, 2:03 PM IST

अमरावती - राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असल्याने प्रचंड नुकसान हे होत आहे. बालविवाह ही समस्या गंभीर आहे. तरी कोरोनाच्या या भयंकर काळात राज्यात एकूण ५६० बाल विवाह रोखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी दिली. एवढे बालविवाह रोखण्याचे प्रयत्न केले असले तरी अनेक ठिकाणी बालविवाह सुद्धा रोखता आले नाही. याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील म्हटले आहे.

राज्यात कोरोना काळात ५६० बालविवाह रोखण्यात यश - मंत्री यशोमती ठाकूर

अधिकाऱ्यांनी समाज माध्यमे, कलाकृती प्रचार साहित्यावर भर द्यावा -

बालविवाह रोखण्यासाठी माहिती व्यवस्था कार्यक्रम करण्याची गरज आहे. असे मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्याकरीता अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक, ग्रामपंचायत यंत्रणाशी समन्वयाने काम करावे, समाज माध्यमे, कलापथके व अन्यत्र कलाकृती प्रचार साहित्य यावर भर द्यावा. अशी मागणी अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

मुख्यमंत्र्याकडे निधीची मागणी करणार -

महिला सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजना साठी केंद्र सरकारकडून राज्य सरकार मोठ्या प्रमाणात निर्भया निधी मिळतो. बालविवाह प्रतिबंधासाठी त्याचा वापर करणे आवश्यक असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे त्या निधीची मागणी करणार असल्याचेही मंत्री यशोमती ठाकुर म्हणाल्या.

हेही वाचा - आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक; लॉकडाऊनबाबत होणार निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.